राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्याविरुद्ध बनावट कागदपत्रप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. व्हिसा अर्जासाठी बनावट कागदपत्रे दिल्याप्रकरणी कुर्ला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
फराज याच्याविरुद्ध बनावट कागद आणि फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय. दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. फराज याने २०२० मध्ये फ्रान्सच्या एका महिलेला तिच्या व्हिसाची मुदत वाढवून देण्यात मदत केली होती. संबंधित प्रकरणाच्या चौकशीनंतर अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर फराज मलिक याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा :
हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की जागतिक दहशतवादी म्हणून घोषित
आनंदाची बातमी.. शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी निधीमध्ये मोठी वाढ
राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द
बिपिन फुटबॉल अनाथ झाला! सुरेंद्र करकेरा यांचे निधन
भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. त्यानी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मुंबई पोलिसांनी नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जिच्यासाठी ही बनावट कागदपत्रे बनवली ती फराज यांची दुसरी पत्नी हॅमलिन आहे. ती फ्रान्सची रहिवाशी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच दुसरो का फ़र्जीवाड़ा बताने वाले, खुद कितने फ़र्जी है, असेही मोहित कंबोज यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Sources :-
Mumbai Police Has Registered FIR Against मियाँ Nawab Malik Son Faraz Malik For Fake Documents Made For Visa Application For 2nd Wife HAMLEEN Who is French Resident !
दुसरो का फ़र्ज़ीवाड़ा बताने वाले , ख़ुद कितने फ़र्ज़ी हैं !@nawabmalikncp— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) January 18, 2023
याआधीही फराज याला सक्तवसुली ईडीने चौकशीचे समन्स बजावले होते. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांमार्फत झालेल्या हवाला प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले होते.