27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाखोटी बातमी दिल्याप्रकरणी लोकसत्ता, संपादक गिरीश कुबेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

खोटी बातमी दिल्याप्रकरणी लोकसत्ता, संपादक गिरीश कुबेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

अमरावतीमध्ये लोकसत्ता आणि संपादक गिरीश कुबेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Google News Follow

Related

अमरावतीमध्ये लोकसत्ता आणि संपादक गिरीश कुबेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणानंतर ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राने जाती- जातीत तेढ निर्माण करणारे वृत्त प्रकाशित केल्याचा आरोप केला आहे. हे वृत्त खोटे, गैरसमज पसरवणारे, जातीय सद्भाव खराब करणारे आणि काही समाज घटकांचा अपमान करणारे असल्याचं म्हणण्यात आलं आहे. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, नागपूर आवृत्तीचे राजेश्वर ठाकरे आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, या भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात शुक्रवारी ७ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शास्त्रांचे आणि रिवाजांचे दाखले देत आपल्या देशात जातीभेद नसल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे वृत्त लोकसत्ता या दैनिकाने ८ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रकाशित केले. “ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवे” असे कुठलेही वाक्य डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले नाही. ते न बोललेले त्यांच्या तोंडी हेतुपुरस्सर घालण्यात आले आणि बातमीत छापण्यात आले. संघविरोधकांनीही चिंतन करावे असे ते भाषण होते. संविधानाने अंगिकारलेल्या जातीरहित समाजाचा स्वीकार हेच भारताचे भविष्य असावे हे त्यांनी सांगितले.

मात्र, लोकसत्ता या दैनिकाने भागवत यांच्या सुधारणावादाविषयी गैरसमज होणारे वृत्त प्रकाशित केले. ज्या शब्दांचा डॉ. मोहन भागवत यांनी उल्लेख केला नाही, ते त्यांच्या तोंडी घालून एका समाजाला दुखावले, अपमानित केले आणि इतर समाजाच्या रोषास कारण निर्माण केले, असे आरोप करण्यात आले आहेत.

हे ही वाचा

भाजपाची माघार, ऋतुजा लटके बिनविरोध

बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत

रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

शिवराय कुळकर्णी यांनी यासंबंधीची तक्रार अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्याकडे दिली होती. त्यानंतर आज बडनेरा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी भादंवीच्या १५३ अ, ५००, ५०१, ५०२, ५०४, ३४ कलमान्वये गिरीश कुबेर आणि राजेश्वर ठाकरे यांच्या विरुद्ध बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा