कोविड घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल

बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप

कोविड घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. मृतदेह ठेवण्याच्या बॅग (बॉडी बॅग) खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.

मुंबई महापालिकेत करोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचं ईडीचे म्हणणे आहे. यात किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग होता, असं ईडीचे म्हणणे आहे. किशोरी पेडणेकर या महापौर असताना हा हा घोटाळा झाला होता. करोना संसर्गाच्यावेळी कोविड उपचारांच्या औषधांची खरेदी करण्यात आली होती. पण ही खरेदी वाढीव दराने करण्यात आली होती, असा आरोप्य आहे. शिवाय बॉडी बॅग खरेदीतही घोटाळा झाला होता. किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरूनच हे कंत्राट देण्यात आलं होतं असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग २ हजार रुपयांऐवजी ६ हजार ८०० रुपयांना खरेदी केल्याचे ईडीने म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला.

दरम्यान, किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली. किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार, असं किरीट सोमय्या म्हणाले. मुंबईच्या महापौर, अतिरिक्त आयुक्त आणि वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधिची तक्रार मुंबई पोलिसात केली होती. आणखी तीन घोटाळ्यांचा तपास सुरु आहे. यावरही कारवाई होणार आहे. आधी संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर जेलमध्ये गेले होते, आता किशोरी पेडणेकर आणि नंतर आणखी तीन नेते जेलमध्ये जाणार, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

लॅपटॉपच्या आयातीवर १ नोव्हेंबरपासून बंदी

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा न्यायालयातच राजीनामा

छ. शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ख्रिश्चन धर्मगुरुंविरोधात गुन्हा दाखल

डोळ्याला पट्टी बांधून असलेल्या आदित्य ठाकरेंना उत्तर देऊन फायदा काय?

दरम्यान, विधानसभेतही कोविड घोटाळ्याचा मुद्दा गाजला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार पाचशे रुपयांची बॉडी बॅग सहा हजार रुपयांना विकत घेण्यात आल्याचं सांगितलं. लोकं मरत होते आणि काही लोक पैसे बनवत होते. हे दुर्देव आहे. यामध्ये जो घोटाळा केला आहे, त्यांना बिलकूल सोडलं जाणार नाही, असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. लाईफ लाईन की डेडलाईन हॉस्पिटल. माणसांना मारणारं हॉस्पिटल होतं ते. आपल्याच लोकांना कंत्राट दिलं. ज्यांना अनुभव नाही, त्यांना काम दिलं, अशी टीका त्यांनी केली.

Exit mobile version