याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल

याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर चेंबूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर येथील एका व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्याने गुन्हा दाखल केला आहे.

छगन भुजबळ यांनी यांनी काही दिवसांपूर्वी सरस्वती पूजनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्याचे व्यावसायिक ललितकुमार टेकचंदानी दोन व्हिडिओ शेअर केले होते. याप्रकरणी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, अशी तक्रार त्या व्यावसायिकाने केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ललितकुमार टेकचंदानी असं तक्रार देणाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी भादवि कलम ५०६ (२) आणि कलम ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. टेकचंदानी यांनी जबाबात म्हटलं की छगन भुजबळ यांना दोन व्हिडीओ पाठवले होते. त्यामध्ये भुजबळ यांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे भाषण केले होते. व्हिडीओ पाठवल्यानंतर लगेच टेकचंदानी यांना धमक्या देणारे कॉल्स आणि मेसेज यायला लागले. त्यात शिवीगाळही केल्याचा आरोप टेकचंदानी यांनी केला आहे.

तू भुजबळ साहेबाना मेसेज पाठवतो, तुझ्या घरी येऊन गोळ्या टाकतो. दुबईची लोकं लावतो, साहेबांना मेसेज करणं महागात पडेल, असे मेसेज टेकचंदानी यांना आले असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून टेकचंदानी यांना हे मेसेज आणि कॉल कुणी केले याचा तपास केला जात आहे. तसेच टेकचंदानी यांनी त्यांना ज्या क्रमांकावरून मेसेज आणि कॉल आले त्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

हे ही वाचा:

मासेमारीसाठी गेलेले १६ मच्छिमार पाकिस्तानच्या ताब्यात

युक्रेनचे चार प्रांत विलीन करण्याच्या करारावर पुतीन यांची स्वाक्षरी

काँग्रेसचा अध्यक्ष, अध्यक्ष खेळ सुरूच

गुजरातमध्ये सापडला खोट्या नोटांचा साठा

छगन भुजबळ यांनी एका भाषणात देवतांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. शाळेमध्ये सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा फोटो लावा पाहिजे. बाबासाहेबांचा लावा फोटो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते.

Exit mobile version