‘तारक मेहता…’ मालिकेच्या निर्मात्यांविरुद्ध गुन्हा दाखल

मालिकेतील कलाकारांनी केले होते आरोप

‘तारक मेहता…’ मालिकेच्या निर्मात्यांविरुद्ध गुन्हा दाखल

टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मालिकेचे निर्माते असित मोदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना लवकरच अटक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी असित मोदी आणि ‘तारक मेहता’शी संबंधित इतर दोन लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या शोमध्ये मिसेस सोढीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने असित मोदींवर लैंगिक छळाचा आरोप केला होता.

या कार्यक्रमात मिसेस सोढीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने असित मोदींवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. अभिनेत्रीने असित मोदी तसेच ‘तारक मेहता’चे कार्यकारी निर्माते जतीन बजाज आणि ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी यांच्याविरोधातही तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या माहितीनुसार, असित मोदी, सोहेल रमाणी आणि जतीन बजाज यांच्या विरोधात कलम ३५४ आणि ५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून असित मोदी यांच्यावर लैंगिक छळ आणि शोषणाचे आरोप केले जात आहेत. मध्यंतरीच्या काळात या मालिकेला अनेक मुख्य कलाकारांनी राम राम केला. तसेच आता त्यातीलच काही कलाकारांनी मालिकेच्या निर्मात्यांविरोधात आवाज उठवला आहे. अनेक कलाकारांनी असित मोदींच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मानधन न दिल्याचा आरोप करत सेटवरील वातावरण खराब असल्याचेही म्हटले आहे.

हे ही वाचा:

मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराला आर्थिक रसद?

ठाकरेंच्या अडचणी वाढणार, कॅगच्या अहवालानंतर एसआयटीची स्थापना

टायटॅनिकचे भग्नावशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी बेपत्ता

दर्शना पवारच्या मृत्यूचे कारण समोर

मिसेस सोढीची भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्री, बावरी फेम मोनिका भदौरिया आणि तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी असित मोदींविरोधात आवाज उठवला होता. सेटवरील वातावरण नीट नसल्याचे मोनिकाहिने सांगितले. तर, शैलेश लोढा यांनी सांगितले की, एक वर्ष झालं तरी मानधन दिलेले नाही.

Exit mobile version