आंध्रमधील महाविद्यालयात मुलींच्या वसतिगृहातील वॉशरूममध्ये कॅमेरा; ३०० हून अधिक छायाचित्रे लीक

आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आंध्रमधील महाविद्यालयात मुलींच्या वसतिगृहातील वॉशरूममध्ये कॅमेरा; ३०० हून अधिक छायाचित्रे लीक

आंध्र प्रदेशातील गुडीवाडा येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाच्या बाथरूममध्ये कॅमेरे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही बाब उघडकीस येताच मध्यरात्री विद्यार्थिनींनी महाविद्यालयात जोरदार निदर्शने केली. या अभियांत्रिकी महाविद्यालयात बीटेकच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहातील बाथरूममध्ये कॅमेरे लावून व्हिडिओ बनवल्याचा आरोप असून तो या व्हिडिओंची विक्रीही करायचा, असा संशय आहे. त्याला या कामात आणखी एक विद्यार्थी मदत करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

वसतिगृहाच्या वॉशरूममध्ये छुप्या कॅमेऱ्याची माहिती एका विद्यार्थिनीने कॉलेज प्रशासनाला दिली होती. जेव्हा ती वॉशरूममध्ये गेली तेव्हा तिला व्हिडिओ काढण्यासाठी लावलेला कॅमेरा दिसला. यानंतर कॅम्पसमधील विद्यार्थिनींनी न्यायाची मागणी केली आहे. गोपनीयतेचे उल्लंघन आणि त्यानंतर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

माहितीनुसार, महाविद्यालयातील विजय नावाचा विद्यार्थी कॅमेऱ्यांमधून व्हिडिओ बनवून त्याची विक्री करायचा. संतप्त विद्यार्थ्यांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला, मात्र पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक लॅपटॉपही जप्त केला आहे. लॅपटॉपची झडती घेतल्यावर पोलिसांना ३०० अश्लील व्हिडिओ सापडले. आरोपी विजयने हे ३०० अश्लील व्हिडिओ कॉलेजच्या इतर विद्यार्थ्यांना विकल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या याचा पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

दहा वर्षांत फिनटेक क्षेत्रात ३१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; स्टार्टअपमध्ये ५०० टक्क्यांची वाढ

‘शिवलिंगावरील विंचू’ वक्तव्यामुळे पंतप्रधानांची बदनामी; थरूर यांना न्यायालयाने फटकारले

गोरेगावमध्ये हिट अँड रन; अल्पवयीन चालकाच्या गाडीच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

राजकोट किल्ला दुर्घटनेप्रकरणी चेतन पाटीलला कोल्हापुरातून अटक

दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांना आश्वासन दिले आहे की ते सखोल चौकशीसाठी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी कृष्णा जिल्ह्यातील गुडलावल्लेरू अभियांत्रिकी महाविद्यालयातून उघडकीस आलेल्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कोल्लू रवींद्र यांच्यासह जिल्हाधिकारी आणि एसपी यांना तातडीने घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले.

Exit mobile version