30 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरक्राईमनामाजम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांकडून बिहारी कामगाराची गोळ्या झाडून हत्या

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांकडून बिहारी कामगाराची गोळ्या झाडून हत्या

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका श्रमिकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना बुधवारी घडली. हा श्रमिक बिहारमधील आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. बिजबेहरा परिसराच्या जबलीपोरा येथे दहशतवाद्यांनी राजा सहा या श्रमिकावर जवळून गोळ्या झाडल्या. यामध्ये तो जबर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाला.

बुधवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागात दहशतवाद्यांनी दोन बिगर-स्थानिकांवर गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा याच्या मानेवर आणि पोटात दोन गोळ्या लागल्या आहेत. सहा याला गंभीर अवस्थेत जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हाणामारी; अनेक जखमी

२०१४ मध्ये आशा, २०१९ मध्ये विश्वास अन २०२४ मध्ये मोदींची ‘गँरंटी’

अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर कारची ट्रकला धडक, १० जण ठार!

मतदानाच्या दिवशी कूचबिहारला भेट देऊ नका!

या घटनेनंतर संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. अलीकडच्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी स्थानिक नसलेल्यांना लक्ष्य केले आहे. गेल्याच आठवड्यात शोपियान जिल्ह्यातील पदपवन भागात दहशतवाद्यांनी स्थानिक नसलेल्या गाईडवर हल्ला केला होता. स्थानिक नसलेले रणजित सिंग हे परदेशी पर्यटकांसोबत होते आणि एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये जेवत होते, तेव्हा तोंड झाकलेले दहशतवादी तेथे घुसले आणि त्यांच्यावर गोळीबार केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा