जम्मू आणि काश्मिरमध्ये पोलिसांचा आयएसजेकेला झटका

जम्मू आणि काश्मिरमध्ये पोलिसांचा आयएसजेकेला झटका

जम्मू आणि काश्मिर पोलिसांना बुधवारी मोठे यश प्राप्त झाले. बुधवारी पोलिसांनी इस्लामिक स्टेट जम्मू अँड काश्मिरच्या (आयएसजेके) एका हस्तकाला अटक केली.

आयएसजेकेच्या अटक करण्यात आलेल्या हस्तकाची ओळख अकिब बशीर पारे अशी पटवण्यात आली आहे. सदर आरोपी हा हांडवारा जिल्ह्याचा रहिवासी असल्याचे कळले आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक प्रशासन मुजोर- अतुल भातखळकर

संजय राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात- चंद्रकांत पाटील

आज डॉक्टरांचे एकदिवसीय कामबंद आंदोलन

कोविडच्या काळात ‘या’ कंपन्यांमध्ये हजारो नव्या नोकऱ्या

“बशीर आयएसजेकेचा हस्तक होता आणि त्यांच्याशी संबंधित कामे करत होता. तो आयएसजेकेच्या कमांडरच्या आदेशानुसार काम करत होता” असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या पुर्वी कोटली झज्जर भागात पोलिसांनी धडक कारवाई केली होती. ही कारवाई जम्मू आणि काश्मिर पोलिस आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने झालेली होती. या कारवाईत जम्मू आणि काश्मिरच्या सीमावर्ती भागातील एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती.

त्याबरोबरच पोलिसांना बराच मुद्देमाल हाती लागला होता. त्या दहशतवाद्याला पिस्तुले, आठ जिवंत काडतुसे आणि एक लाख तेरा हजार रुपयांची नगद रक्कम एवढ्या मुद्देमालासह बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. दिनांक ४ एप्रिल रोजी ही कारवाई केली होती.

त्यानंतर आता आणखी एका दहशतवाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या बाबत एएनआय वृत्तसंस्थेने ट्वीटकरून माहिती दिली आहे.

Exit mobile version