मुंबई हल्ला धमकी प्रकरणी वसईतून न्हाव्याला घेतलं ताब्यात

मोहम्मद आसिफ असे या संशयिताचे नाव आहे.

मुंबई हल्ला धमकी प्रकरणी वसईतून न्हाव्याला घेतलं ताब्यात

मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला आज आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धमकीचे मेसेज आले आहेत. २६/११ सारखा हल्ला मुंबईवर करणार असल्याचं या मेसेजेसमध्ये म्हटलं आहे. यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुंबई गुन्हे शाखेने वसईतून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

मोहम्मद आसिफ असे या संशयिताचे नाव आहे. तो पेशाने न्हावी असून, वसईत त्याचे सलून आहे. धमकी मेसेज प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, मेसेज प्रकरणात त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा:

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर

१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?

कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट

निर्बंधमुक्त दहीहंडीमुळे गोविंदा घेतायत मोकळा श्वास

आज, २० ऑगस्ट रोजी सकाळी मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज आला होता. याप्रकरणी भारतात सध्या सहा लोक काम असून, ते काम करणार असल्याचं मेसेजमध्ये म्हटलं आहे. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. धमकीचे मेसेज आल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकारांना याची माहिती दिली आहे.दरम्यान, ज्या क्रमांकावरून मेसेज आला आहे त्या क्रमांकावर ‘एबीपी माझा’च्या प्रतिनिधीने धमकीचा मेसेज आलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी हा क्रमांक पाकिस्तानमधील असल्याचं समोर आलं आहे. संबंधित क्रमांक हा पाकिस्तानमधील असून हा नंबर वापरणाऱ्या व्यक्तीचं नाव इम्तियाज असे आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला या संदेशाबाबत काहीही कल्पना नाही.

Exit mobile version