संतापजनक! मुंबईत ६४ वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीला ठोकल्या बेड्या

पीडित महिलेवर उपचार सुरू; प्रकृती चिंताजनक

संतापजनक! मुंबईत ६४ वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीला ठोकल्या बेड्या

मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ६४ वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमेश गुलाबराव ढोके (वय ३८ वर्ष) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याची चौकशी केली असतान त्याने आपल्या आरोपाची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

माहितीनुसार, सोमवार, १८ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी उमेश ढोके याने महिलेला घरी सोडतो असं सांगून महिलेला आपल्या घरी नेले. त्यानंतर त्याने महिलेवर अत्याचार केले. महिलेने विरोध केल्यावर आरोपीने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं आणि घटनास्थळावरून पळ काढला.

त्यानंतर मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास स्थानिक महिलेला ही पीडित महिला रस्त्यावर आढळून आली. महिलेने संबधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. पीडित महिलेने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

हे ही वाचा:

निलंबित खासदारांना मतदानाचा हक्कही नाही; दैनंदिन भत्त्यापासूनही मुकावे लागणार!

तामिळनाडूत पावसाचा तडाखा, १० जणांचा मृत्यू!

डॉ. हेडगेवार स्मृतीस्थळाच्या दर्शनाने ऊर्जा, प्रेरणा मिळते

काँग्रेसची भारत जोडो यात्रा २ जानेवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता!

चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप

या संतापजनक घटनेनंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “वयाचेही भान न ठेवता मातेसमान स्त्रीलाही उपभोगाची वस्तू मानत केवळ आपल्या शारीरिक हव्यासापोटी एका ६४ वर्षीय महिलेवर ३८ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द इथे घडली आहे. घरी सोडतो असे खोटे सांगून उमेश ढोके नावाचा हा नराधम चेंबूर मधील घरकाम आणि मासेविक्री करणाऱ्या त्या महिलेला मानखुर्द येथील आपल्या राहत्या घरी घेऊन गेला. रात्रभर तिच्यावर बलात्कार करत, नंतर मारहाण करत पहाटे घराबाहेर विवस्त्र अवस्थेत त्याने तिला फेकून दिले. पोलिसांनी ॲक्शन घेत ज्या तत्परतेने आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला तितक्याच जलद गतीने कारवाई होत त्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा होईल, हे नक्की. कारण, महिलांची सुरक्षितता ही प्राथमिकता मानणारे आमचे संवेदनशील सरकार अशा घटनांकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही,” अशा भावना चित्रा वाघ यांनी व्यक्त केल्या.

Exit mobile version