अकोला जिल्ह्यात एका मुलाचे धर्मांतरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलाच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास चान्नी पोलीस करत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथे दाभाडे कुटुंबीय राहतात. कुटुंबात पती- पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असून सर्वात मोठा मुलगा शुभम हा १९ वर्षांचा आहे. तीन महिन्यांपूर्वी शुभम हा अल्ताफ गादीवाले, अन्सार गादीवाले, शेख तन्वीर शे. अजीम शे. मंजूर आणि इतर दोघांच्या संपर्कात आला. तेव्हा त्याला त्याला फूस लावून काम देण्याचे आमिष दाखवून हैदराबादला नेण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात त्याला बुलढाणा जिल्ह्यातील उंद्री येथील मदरसात ठेवण्यात आले होते.
अनेक दिवस झाले मुलाचा संपर्क नसल्याने शुभम याची आई ज्योती दाभाडे यांनी अल्ताफ आणि अन्य संबंधितांकडे विचारणा केली. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर त्या शुभमला भेटायला म्हणून हैदराबाद येथे गेल्या. तेथून त्यांनी शुभमला फोन केला असता त्याने फोन घेतला आणि तू घरी जा असे सांगून बंद केला. पुन्हा काही दिवसांनी ज्या फोनहून त्याचा फोन आला त्यावर विचारणा केली असता तो क्रमांक उंद्री येथील मदरशाचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा मदरशात जाऊन ते शुभम याला माघारी घेऊन आले.
पुढे काही दिवसांनी शुभमच्या पॅन्टच्या खिशात त्यांना कागद सापडला. त्यावर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारल्याबाबतचा मजकूर होता. ही घटना लक्षात येताच त्यांनी अल्ताफ आणि त्याच्या साथीदारांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी तुमचा मुलगा मुस्लिम धर्मात आल्याचे सांगत कुटुंबियांनाही मुस्लीम धर्म स्वीकारण्यास सांगितले. तसेच त्यांना शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर ज्योती दाभाडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
हे ही वाचा:
भारत- फ्रान्स यांच्यात ९० हजार कोटींचा संरक्षण करार होणार?
चांद्रयानच्या यशस्वी उड्डाणासाठी तिरुपतीला साकडे
बच्चू कडू मंत्रिपदाचा दावा सोडणार होते, पण मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे थांबले
आंध्र प्रदेशातून चंद्र प्रदेशात; आज चांद्रयान ३ घेणार झेप
मुलाचे धर्मांतरण केले असा आरोप करीत चान्नी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करत अल्ताफ, अन्सार गादीवाले, शे. तन्वीर, शे. अजीम शे. मंजूर यांना अटक केली आहे.