32 C
Mumbai
Friday, October 18, 2024
घरक्राईमनामाउत्तराखंडमध्ये डेहराडून एक्सप्रेस उलटवण्याचा कट; रेल्वे रुळावर आढळला १५ फुटांचा लोखंडी रॉड

उत्तराखंडमध्ये डेहराडून एक्सप्रेस उलटवण्याचा कट; रेल्वे रुळावर आढळला १५ फुटांचा लोखंडी रॉड

लोको पायलटच्या सतर्कतेमुळे टळली जीवितहानी

Google News Follow

Related

उत्तराखंडमध्ये ट्रेन उलटवण्याचा कट रचल्याची घटना समोर आली आहे. डेहराडून एक्सप्रेस ट्रेन उलटवण्याचा कट रचल्याची माहिती उघडकीस आली असून रेल्वे रुळावर लोखंडी पट्टी असल्याचे लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. काठगोदामहून डेहराडूनला जाणाऱ्या डेहराडून एक्स्प्रेसला रुळावर बार लावून उलटण्याचा प्रयत्न करण्यात आला. रेल्वे रुळावर १५ फूट लांब रॉड पडलेला आढळून आला. ज्यावर डेहराडून एक्स्प्रेसचे इंजिन चढले. इंजिनखालून मोठा आवाज आणि ठिणग्या येऊ लागल्यावर लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावून ट्रेन थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

माहितीनुसार, डेहराडून एक्स्प्रेस पहाटे साडेचार वाजता डेहराडूनच्या दिशेने जात होती. डोईवाला आणि हररावला दरम्यान एक्स्प्रेस येताच येताच रुळावर असलेल्या रॉडला इंजिन धडकले. त्याचं वेळी ट्रेनचे लोको पायलट अनुज गर्ग यांना इंजिनच्या खालून मोठा आवाज आला आणि स्पार्क वाढत असल्याचे लक्षात आले. त्यांनी धोका ओळखून तातडीने इमर्जन्सी ब्रेक वापरून ट्रेन थांबवली. यानंतर त्यांनी स्वतः खाली उतरून पाहणी केली असता इंजिनच्या खाली रेल्वे रुळावर १५ फूट लांब जाड असा रॉड असल्याचे लक्षात आले.

या घटनेनंतर लोको पायलटने तात्काळ ट्रॅकवरून रॉड हटवला आणि ट्रेनला मार्गस्त केले. एक्स्प्रेस सुरक्षितपणे डेहराडून रेल्वे स्थानकावर आल्यानंतर या घटनेची माहिती लगेचच लोको पायलटने रेल्वे अधिकारी आणि रेल्वे संरक्षण दलाला (आरपीएफ) माहिती दिली. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वेने डोईवाला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आणि जीआरपीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा:

५ कोटी न दिल्यास सलमानची अवस्था बाबा सिद्दींकीपेक्षा वाईट करण्याची धमकी

राजकोट पुतळा प्रकरण: पुतळ्याचे वेल्डिंग करणाऱ्याला उत्तर प्रदेशमधून अटक

हमासचा म्होरक्या सिनवरच्या खोपडीचा इस्रायलने घेतला वेध

राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची हत्या एसआरएच्या वादातूनच ?

गेल्या काही महिन्यांत विविध राज्यांमध्ये अशी प्रकरणे वारंवार घडत आहेत. रेल्वे रुळावर काही वस्तू ठेवून रेल्वे उलटवण्याचा कट रचण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधून अशा घटना वारंवार समोर येत असून अनेक ठिकाणी रुळावर सिमेंट बार, सिलिंडर आणि ब्लॉक टाकून ट्रेन रुळावरून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राजस्थानमध्येही रेल्वे रुळावरून घसरण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय झारखंड आणि इतर राज्यांतूनही अशीच प्रकरणे समोर आली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा