भिवंडीत कारखान्याची भिंत कोसळून १० वर्षीय मुलाचा मृत्यू

१४ वर्षीय मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

भिवंडीत कारखान्याची भिंत कोसळून १० वर्षीय मुलाचा मृत्यू

भिवंडीमध्ये यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळून दोन अल्पवयीन मुले ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली. भिवंडीमधील ४० वर्षे जुन्या यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. स्थानिकांच्या मदतीने मुलांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आलं, परंतु त्यापैकी एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू असून दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून भिवंडी शहरातील दिवानशाह दर्गा रोड येथील कोतवाल शाह दर्गाच्या मागे साधारण ४० वर्षे जुना यंत्रमाग कारखाना आहे. या जुन्या यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली आणि त्या ढिगाऱ्याखाली दोन लहान मुले अडकली. ही बाब लक्षात येताच तत्काळ स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखालून मुलांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले. परंतु, त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी असून त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.  मोहम्मद हुसेन इरफान अन्सारी (१० वर्ष) असे ढिगाऱ्यखाली दबून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, रिजवान अन्सारी (१४ वर्ष) असे जखमी मुलाचे नाव आहे

दिवानशाह दर्गा रोड परिसरात कोतवाल शाह दर्गाच्या मागे सुमारे ४० वर्षे जुना यंत्रमाग कारखाना होता. त्या ठिकाणी कारखाने बंद झाले असून सध्या विकास प्रकल्पांच्या अंतर्गत नवीन बांधकाम करण्याकरता या कारखान्यांवर तोडक कारवाई सुरू आहे. दरम्यान हा कारखाना कमकुवत झालेला असून सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी विकासकांकडून घेण्यात आलेली नाही. या संदर्भात स्थानिकांनी वारंवार तक्रार देखील केली आहे. परंतु, जमीन मालक तसेच विकासक यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

हे ही वाचा:

अमित शहांची मध्यस्थी; दोन महिन्यांनंतर मणिपूरमधील राष्ट्रीय महामार्ग मोकळा

आधी नितीश, केजरीवाल, नंतर महाराष्ट्र विरोधी पक्षांच्या एकजुटीला तडे

राष्ट्रवादीकडून ९ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल

‘गोलमाल’मधील अभिनेते हरिश मैगन यांचे निधन

रविवारी सायंकाळच्या सुमारास कारखान्याची एका बाजूची भिंत अचानक कोसळली.  या भिंती शेजारी ही दोन्ही मुलं खेळत होती. त्यावेळी या भिंतीचा भाग दोन मुलांच्या अंगावर पडला. स्थानिकांनी तात्काळ ढिगारा बाजूला करण्यास सुरुवात केली; त्यांना यशही आलं. परंतु, त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यासंदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस या संपूर्ण घटनेची चौकशी करीत आहेत.

Exit mobile version