सणासुदीच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन शॉपिंग करण्याचे सध्या ट्रेण्डच आला आहे. त्याच बरोबर आता सायबर चोरटे सुद्धा मोठ्या प्रमाणात संधीचा फायदा घेत लोकांना लाखोंचा गंडा घालत आहेत. ह्याच आधारावर डोंबिवली येथील नागरिकाला डिलिव्हरी बॉयने सर्व्हिस चार्जेससाठी १० रुपये भरावे लागतील. असे सांगून मोबाईल फोनवर एक लिंक पाठवली. त्या व्यक्तीने लिंक उघडली असता, त्याच्या खात्यातून ९६,९९९ रुपये ऑनलाईन ट्रान्सफर झाले. ठाणे सायबर क्राईम शाखेच्या सतर्कतेमुळे या व्यक्तीला ८१,००० रुपये पुन्हा मिळाले, अशी माहिती ठाणे सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसानी दिली.
डोंबिवलीकर व्यक्तीचे नामांकित कंपनीत बॅक अकाउंट होते. सदर चेकबुक हे कुरियर द्वारे येणार असल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान या व्यक्तीला कुरियर कंपनीतून फोन आला. चेकबुक पार्सल करण्यासाठी १० रुपये अतिरिक्त पैसे भरावे लागतील. असे कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्या व्यक्तीने विश्वास ठेवून, मोबाईलवर आलेली लिंक उघडली. आणि त्यातून ९६,९९९ रुपये पैसे ट्रान्सफर झाल्याची माहिती मिळाली. सदरव्यक्ती ही डोंबवली पूर्व येथे राहणारी असून, एका प्रतिष्ठित बँकेचे चेकबुक मागवले होते.
हे ही वाचा:
राम मंदिराचे ४० टक्के काम पूर्ण, या दिवशी भाविकांना घेता येणार दर्शन
भारताचे ‘हार्दिक’ अभिनंदन; पाकिस्तानला नमविले
‘स्वातंत्र्यदिनानिमित्त सामुहिक शक्तीचे घडले दर्शन’
गृहमंत्री अमित शहा मुंबईत ‘या’ गणेशोत्सवाला भेट देणार
सदर इसमाला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या व्यक्तीने डोंबवली येथील मानपाडा पोलिस स्थानकात तक्रार केली. पोलिसांनी व्यक्तीची तक्रार ऐकून अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची तपासणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलम वाव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राजेंद्र नेगी यांनी सुरु केला आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे यूपीएआय आयडीद्वारे क्रेडिटचे भरलेले ८१ हजार रुपये डोंबवलीकर व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत.