27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाईडी अधिकाऱ्यांना छाप्यात सापडलेल्या सोने, चांदीमुळे डोळे दिपले

ईडी अधिकाऱ्यांना छाप्यात सापडलेल्या सोने, चांदीमुळे डोळे दिपले

बुलीयन ट्रेडर्स विरोधात सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान झाली कारवाई

Google News Follow

Related

गेल्या एक आठवड्यापासून पारेख अल्युमिनियमविरोधात ईडीची कारवाई सुरु होती. ईडीने या छापेमारीत ४७ कोटीहून अधिक किमतीचे सोने आणि चांदी जप्त केली आहे. बुलीयन ट्रेडर्स विरोधात सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीची ही कारवाई केली आहे.

पारेख अल्युमिनियम कंपनीने अनेक बँकांना फसवुन २ हजार २९६.५८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर हे पैसे विविध कंपन्यांच्या माध्यमातून असुरक्षित कर्ज आणि गुंतवणुकीच्या संदर्भात पैसे विविध खात्यांमध्ये पाठवले गेले. याप्रकरणी पारेख अल्युमिनियम लिमिटेड विरुद्ध मनी लॉडिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने डिफेन्स बुलियन आणि क्लासिक मार्बल्सच्या चार ठिकाणांवर छापे टाकले आहेत. पारेख अल्युमिनियम लिमिटेड विरुद्ध २ हजार २९६ कोटी रुपयांची बँकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाची मार्च २०१८ पासून चौकशी सुरू आहे.

ईडीने छाप्यात ७६१ लॉकर्सची झडती घेतली, त्यापैकी दोन लॉकरमधून ९१.५ किलो सोने आणि १५२ किलो चांदी जप्त केली आहे. त्याच वेळी, ईडीने आणखी एका ठिकाणाहून १८ किलो चांदी जप्त केली आहे. एकूण ९१.५ किलो सोने आणि ३४० किलो चांदी जप्त केली आहे. याआधीही ईडीने जुलै २०१९ मध्ये ४६.९७ कोटी रुपये आणि सप्टेंबर २०१८ मध्ये १५८.२६ कोटी रुपये जप्त केले होते.

हे ही वाचा:

साधू मारहाण प्रकरणी सहाजण ताब्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोलिस निरीक्षकाने केली होती विकृत पोस्ट

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात ‘या’ सेवा मिळणार मोफत

गाेव्यामध्ये काॅंग्रेसचे आठ आमदार ‘पदयात्रा’ करत भाजपात

ईडीला काही मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारात खाजगी लॉकरच्या चाव्या मिळाल्या होत्या. या लॉकर्सची झडती घेतली असता नियमांचे पालन न करता लॉकर्स चालवले जात असल्याचे आढळून आले. यासाठी केवायसी पाळले गेले नाही आणि आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याचे आढळून आले आहे. तसेच खाजगी लॉकरच्या आत आणि बाहेर नोंदीसाठी कोणतेही रजिस्टर ठेवण्यात आले नव्हते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा