नागपुरात ड्रंक अँड ड्राइव्हची घटना घडली आहे. फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना एका कारने चिरडलं आहे. या दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ ही दुर्घटना घडली. काल (१६ जून) रात्री ११.४५ ते १२ च्या आसपास ही घटना घडल्याची माहिती आहे. गाडी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपी कार चालक मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भूषण लांजेवार असे कार चालकाचे नाव आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करावी, असे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात सुरू झालाय ‘फेक नरेटीव्ह सिझन-२
पोलीस भरतीची प्रक्रिया १९ जूनपासून होणार सुरु, गैरप्रकार आढळल्यास होणार गुन्हा दाखल!
महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी म्हणून दोन केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती!
किरण शेलार यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या
मिळालेल्या माहितीनुसार, मजुरांना चिरडलेल्या कारमध्ये एकूण पाच जण बसले होते. त्यांच्यापैकी भूषण लांजेवार हा कार चालवत होता. हे सर्व तरुण वाढदिवसाची पार्टी करून निघाले होते, ते सर्व मद्यधुंद अवस्थेत होते. त्याचवेळी वेगाने असलेली कार दिघोरी नाक्याजवळ फुटपाथवर झोपलेल्या राजस्थानी मजुरांच्या अंगावर चढली. हे सर्व मजूर फुटपाथच्या बाजूला छोट्या वस्तू विकून पोट भरणारे मजूर होते. वेगात असलेली कार मजुरांच्या अंगावर गेल्याने ९ जण जखमी झाले तर दोघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कारचालकासह पाचही जणांना अटक करण्यात आली आहे.