गडचिरोली पोलिसांकडून कुकरमध्ये पुरून ठेवलेली ९ आयईडी, ३ क्लेमोर स्फोटके नष्ट

नक्षलग्रस्त टिपागड टेकडी परिसरात झाली कारवाई

गडचिरोली पोलिसांकडून कुकरमध्ये पुरून ठेवलेली ९ आयईडी, ३ क्लेमोर स्फोटके नष्ट

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून जोरदार तपासणी सुरू आहे. अशातच गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत नक्षल्यांनी दडवून ठेवलेली स्फोटके नष्ट केली आहेत. घातपात घडवून आणण्यासाठी नक्षल्यांनी जमिनीत ६ कुकरमध्ये पुरून ठेवलेली ९ आयईडी आणि ३ क्लेमोर स्फोटके गडचिरोली पोलिसांनी नष्ट केली आहेत. नक्षलग्रस्त टिपागड टेकडी परिसरात विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने ही कारवाई पार पाडली.

गडचिरोलीमध्ये निवडणुका यशस्वी पार पडल्या असून निवडणुकीदरम्यान नक्षल्यांकडून होणाऱ्या हिंसक कारवाया लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष नियोजन केले होते. त्यानुसार नक्षली भागात कारवायांनाही वेग आला होता. मोठा घातपात घडविण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी टिपागड परिसरात मोठ्या प्रमाणात पुरून ठेवललेली स्फोटके तशीच होती.

हे ही वाचा:

पीओके भारतात सामील होण्याबाबत केलेल्या विधानावर अब्दुल्ला म्हणतात, पाकिस्तानने बांगड्या भरलेल्या नाहीत

‘पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग; मात्र लोकांना ते विसरायला लावले’

इस्रायलने बंद केले अल जजीराचे कार्यालय!

‘भाजपला मदत करण्यासाठी हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला’

दरम्यान, सोमवार, ६ मे रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नक्षलाविरोधी पथक सी ६०, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद कृती पथक आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला टिपागड परिसरात शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. यावेळी जवानांना स्फोटकांनी भरलेले ६ प्रेशर कुकर, ३ क्लेमोर पाईप, गन पावडर, औषधे आणि इतर साहित्य आढळून आले. बॉम्ब शोधक पथकाने ९ आयईडी, ३ क्लेमोर घटनास्थळीच नष्ट केले उर्वरित साहित्य जागीच जळून खाक झाले आहे. दरम्यान, टीम संघ क्रॉस कंट्रीमधून जवळच्या चौकीकडे परतण्याच्या मार्गावर आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नक्षल्यांनी टिपागड परिसरात स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती यावरून कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version