८६ वर्षीय डॉक्टर यांची गळा आवळून हत्या करून दागिने लुटू पळून गेलेल्या केअरटेकरला सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली आहे.जेष्ठ नागरिकांची नोकराकडून हत्या आणि लूटमार होण्याची मागील पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे. या घटनांमुळे जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून जेष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मालाड पश्चिम ओरलेम चर्च या ठिकाणी राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेची २२ एप्रिल रोजी मोलकरीणने आपल्या प्रियकराच्या मदतीने हत्या करून घरातील वस्तू लुटून पोबारा केला होता, या घटनेला पंधरा दिवस उलटत नाही तोच ७ मे रोजी सांताक्रूझ पश्चिम सेंट्रल अव्हेनू, हेलेना इमारत येथे राहणारे ८६ वर्षीय डॉ.मुरलीधर पुरुषोत्तम नाईक यांची गळा आवळून हत्या करण्यात आली. डॉ. मुरलीधर यांची हत्या त्यांच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आलेल्या कृष्णा परिहार (३०)या नोकराने केल्याचे उघडकीस आले. हत्येनंतर त्याने डॉ. मुरलीधर यांच्या अंगावरील दागिने, घड्याळ चोरी करून पोबारा केला होता.
डॉ.मुरलीधर आणि पत्नी उमा नाईक (८०) हे एकत्र राहत होते,त्यांची मुले मुंबईतच दुसरीकडे राहण्यास आहे. डॉ. मुरलीधर यांची देखरेख करण्यासाठी हेल्थ केअर एट होम इंडिया प्रा.ली यांच्याकडून केअरटेकर ठेवण्यात आला होता, तो केअर टेकर सुट्टीवर गेल्यामुळे या कंपनीने तात्पुरता कृष्णा परिहार याला कामासाठी पाठवले होते.डॉ.मुरलीधर आणि नोकर कृष्णा हे एका खोलीत तर पत्नी उमा नाईक दुसऱ्या बेडरूममध्ये झोपत असे.
हे ही वाचा:
‘चॅटजीपीटी’चा पहिला बळी; चीनमध्ये खोट्या अपघाताची बातमी करणाऱ्याला अटक
धक्कादायक!! इराणमध्ये यावर्षी २०३ जणांना फासावर लटकवले!
मॉलमध्ये खरेदी करताना भारतीय वंशाच्या महिलेला लागली गोळी आणि…
लोकलमध्ये फुकटची थंड हवा घेणारे प्रवासी वाढले
७ मे रोजी रात्री कृष्णा याने डॉ. मुरलीधर यांचे हातपाय बांधून तोंडाला चिकटपट्टी चिटकवून गळा आवळून हत्या केली, व दागिने चोरी करून पसार झाला होता, सुदैवाने उमा नाईक दुसऱ्या बेडरूम मध्ये होत्या त्यांनी आतून कडी लावल्यामुळे त्या बचावल्या. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी हत्या आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असतांना नोकर कृष्णा परिहार याला अटक करण्यात आली.