कुराण शिकण्यासाठी मशिदीत येणाऱ्या १५ वर्षीय मुलावर मशिदीत बांग देणाऱ्या ८० वर्षीय मौलवीने लैगिंक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना दक्षिण मुंबईत उघडकीस आली आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात मौलवीकडून करण्यात आलेल्या घृणास्पद प्रकारामुळे स्थानिकामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. जेजे मार्ग पोलिसांनी ८० वर्षीय मौलवी विरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल केला असून मौलवीला अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
शिवाजी सावंत यांची ‘छावा’ कादंबरी आता इंग्रजीत !
शेख हसीना पुन्हा पंतप्रधान होत आहेत!
पाकिस्तानचा रडीचा डाव, बलुचिस्तान रेल्वे अपहरणाला म्हणे भारत जबाबदार!
लँड जिहादद्वारे प्रयागराजच्या पौराणिक स्थळांवर अतिक्रमण होते
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मुंबईत राहणारा १५ वर्षाचा मुलगा रमजानच्या महिन्यात दक्षिण मुंबईतील एका मशिदीत कुराण शिकण्यासाठी येत होता, या मशिदीत बांग देणारा ८० वर्षीय वृद्ध मौलवी हा या मुलाला कुराण शरीफ शिकवत होता. २६ फेब्रुवारी आणि ६ मार्च रोजी या मौलवीने कुराण शिकण्यासाठी मशिदीत येणाऱ्या या मुलांवर दोन वेळा लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलाने त्याच्यासोबत झालेला प्रकार कुटूंबाला सांगितला असता, कुटूंबियांनी तात्काळ जेजे मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. बुधवारी पोलिसांनी ८० वर्षीय मौलवीवर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मौलवी हा वयोवृद्ध असल्यामुळे एसीपीची विशेष परवानगी घेऊन मौलवीला अटक करण्यात आली. मौलवीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.