ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे एका मिनीबसने बाजूला थांबलेल्या ट्रकला मागून धडक दिली.या अपघातात दोन कुटुंबातील आठ जण ठार झाले, तर सात जण जखमी झाले आहेत.घाटगाव पोलीस ठाण्यांतर्गत बळीजोडीजवळ NH-२० वर हा अपघात झाला.केओंजरचे एसपी नितीन कुशाळकर यांनी सांगितले की, दोन कुटुंबातील सदस्य गंजम जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी माँ तारिणी मंदिरात पूजा करण्यासाठी घाटगावला जात असताना हा अपघात झाला.
मिता प्रधान, त्यांचा मुलगा आकाश, सून लिली अशी मृतांची नावे आहेत. त्याचप्रमाणे बयाखंड गौडा, मदन गौडा, ममिना गौडा, बबिना गौडा अशी मृत्यू झालेल्या अन्य कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. गौडा कुटुंबातील आणखी एका मृत सदस्याचे नाव अद्याप पोलिसांना समजू शकले नाही.
हे ही वाचा:
अबब! मोबाईल नाहीतर अख्खा मोबाईल टॉवरच गेला चोरीला!
बेंगळुरूमधील १५ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!
इस्रायलकडून हमासवर पुन्हा हल्ले सुरू!
नक्षलवाद्यांचे ‘हमास’ला समर्थन; महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर लावले फलक
जखमींपैकी पाच जणांवर केओंझार जिल्हा मुख्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर इतर तिघांची प्रकृती खालावल्याने त्यांना कटक येथील एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले आहे.पोलिसांनी सांगितले की, गंजम जिल्ह्यातील पुडामरी गावातील एकूण २० लोक त्रारिणी देवीचे दर्शन घेण्यासाठी जात होते.मंदिरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर हा अपघात घडला.वाहन चालकाला झोप लागल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.