अमेरिकन व्हिसासाठी त्याने मोजले आठ कोटी

मुलीला अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलानी घाटकोपर येथील उद्योगपतीला करोडो उपयांचा चुना लावला आहे.

अमेरिकन व्हिसासाठी त्याने मोजले आठ कोटी

अमेरिकेत मुलीला नोकरी करण्यासाठी व्हिसा मिळावा यासाठी घाटकोपर येथील व्यवसायिकाने बनवेगिरी करणाऱ्याला तब्बल ८ कोटी ३३ लाख रुपये मोजल्याचे समोर आले आहे.

तसेच या व्यापाऱ्यानी मुलीला अमेरिकेत कायम राहण्यासाठी आणि ग्रीन कार्ड मिळवून देतो असे सांगून या व्यवसायिकाकडून जय शहा आणि निशा दुसारा नावाच्या महिलानी ही रक्कम उकळ्यांची तक्रार या व्यवसायिकाने केली आहे. याप्रकणी टिळकनगर पोलिस ठाण्यात दोघाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच या व्यवसायिकाने अमेरिकेत मुलीला नोकरी मिळावी यासाठी घाटकोपरच्या व्यवसायिकाने वेगवेगळ्या वेबसाइट वर नोंदणी केली होती. जय शहा आणि निशा दुसारा या दोघांनी संपर्क साधला. अमेरिकेत चांगल्या पगाराची नोकरी, त्यासाठी आवश्यक असलेला व्हिसा आणि कायमचे नागरिकत्व मिळवून देण्याचे आमिष या दोघांनी दाखवले. तसेच या भाटमत्यांनी आपली अमेरिकेतील भारतीय दुतवासात चांगली ओळख असल्याचे सांगितले. बनवेगीरी लोकांवर विश्वास ठेवून सन २०१५ पासून टप्प्याटप्प्याने ८ कोटी ३३ लाख रुपये दिले.

हे ही वाचा:

उत्तरप्रदेशमध्ये भिंत कोसळून चौघांचा मृत्यू

पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले

“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”

बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप

बरीच वर्ष लोटल्यानंतर अमेरिकेत कामाचे काहीच होत नसल्याने या व्यवसायिकांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केली. मात्र वेगवेगळी कारणं सांगून पैसे टाळत असल्याचे लक्षात आले. अखेर व्यवसायिकांनी पोलिसात धाव घेऊन जय शहा आणि निशा दुसारा या दोघींच्या विरुद्धत तक्रार दाखल केली.

Exit mobile version