जोगेश्वरीमधून सातवा दहशतवादी पकडला

जोगेश्वरीमधून सातवा दहशतवादी पकडला

महाराष्ट्र एटीएस आणि गुन्हे शाखेने केलेल्या एकत्रित कारवाई केली आणि शुक्रवारी रात्री जोगेश्वरीमधून एकाला ताब्यात घेतलं. जाकीर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे कनेक्शन अटक केलेल्या अतिरेक्यांसोबत असल्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी वर्तवली आहे. इतकंच नाही तर संशयित व्यक्ती अंडरवर्ल्डशी संबंधित असून, तो जान मोहम्मदचा हँडलर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एटीएस आणि क्राईम ब्रांचकडून सध्या याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

जाकीर हुसेन शेखची अटक ही एटीएसची महत्वपूर्ण कारवाई समजली जाते. कारण दिल्लीत अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांच्या योजनेबद्दल त्याच्याकडे महत्वपूर्ण माहिती असल्याचं सांगण्यात येतंय. जाकीरने नेमकं कोणाच्या आदेशावरून जान मोहम्मदला हत्यार आणि विस्फोटांची डिलिव्हरी करण्यास सांगितलं होतं याचा खुलासा लवकरच होऊ शकतो.

जान मोहम्मदला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर मुंबई एटीएस जाकीर हुसेन शेखच्या मागावर होते. त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी जाकीर शेख हा मुंब्रामध्ये सुरक्षित जागा शोधत होता. त्याने त्याच्या पत्नीला वांद्रे येथील एका नातेवाईकाकडे ठेवलं होतं. याची माहिती मिळताच एटीएसने सापळा रचला. जाकीरच्या पत्नीला त्याला फोन करायला सांगून त्याला एका ठिकाणी भेटायला बोलावलं आणि त्याला ताब्यात घेतलं.

हे ही वाचा:

…म्हणून अनिल देशमुखांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

विद्यापीठ अधिकारी घेऊ शकणार फक्त १२ लाखांपर्यंतच गाडी!

तिला व्हायचे आहे बॅडमिंटनपटू; पण पोट भरण्यासाठी चिरावी लागतेय भाजी

सेंट्रल व्हिस्टावरून मोदींनी धरले विरोधकांना धारेवर

जान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. सहा संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे. देशभर सण-उत्सवांची धामधूम सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवून खळबळ उडवून देण्याची दहशतवादी योजना असल्याचं समोर आलं आहे.

Exit mobile version