सोमवारी रात्री जम्मू -काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. यामध्ये एक पाकिस्तानी अतिरेकी ठार झाला, तर दुसरा पकडला गेला, तर तीन भारतीय सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
लष्कराने संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर शनिवारी बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीविरोधी कारवाई सुरू केली होती.
घुसखोरांना सैनिकांनी ललकारले आणि एन्काऊंटर सुरु झाला. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारामध्ये तीन सैनिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. उरीच्या आजूबाजूच्या परिसरात कोम्बिंग आणि सर्च ऑपरेशन सुरू आहे.
लष्कराने उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर एका आठवड्यात घुसखोरीचा हा तिसरा प्रयत्न अयशस्वी केला आहे. उत्तर काश्मीरच्या उरी सेक्टरचे १५ कोअर जनरल ऑफिसर लेफ्टनंट जनरल डीपी पांडे यांनी या प्रयत्नांना नियंत्रण रेषावरील “खोडसाळपणा” म्हणून संबोधले आहे.
गेल्या आठवड्यात लष्कराने उरीतील नियंत्रण रेषेवर हातलंगा गावात तीन घुसखोरांना ठार केले. लष्कराने सांगितले की, पाच दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता जेव्हा त्यातील तीन ठार झाले. त्यांच्याकडून ६९ ग्रेनेडसह शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.
हे ही वाचा:
पंजाबमध्ये भाजपाला ‘कॅप्टन’ मिळणार?
योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार! सात नव्या चेहऱ्यांना संधी
आज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!
तत्पूर्वी, सैनिकांनी घुसखोरांना पाहिल्यानंतर सैन्याने त्याच सेक्टरमधील गव्हालोन गावात घुसखोरांसोबत गोळीबार झाला होता. उरी येथील बोनियार येथे एका कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल पांडे यांनी पत्रकारांना सांगितले की, घुसखोरीच्या या प्रयत्नांमुळे लोकांनी चिंता करू नये, आमचे सैनिक सतर्क आहेत. अशा कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत.