28 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामा७१ वर्षीय आजोबा शेतात गेले ; नंतर सापडले त्यांचे तुकडे

७१ वर्षीय आजोबा शेतात गेले ; नंतर सापडले त्यांचे तुकडे

हिंस्त्र पशुनी केले भक्ष की झाले खून..?

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील पश्चिम विभागातील मराठवाड्यातील लातूरमध्ये एक विचित्रच घटना घडली आहे. लातूर शहराजवळील बाभळगाव पंचक्रोशीत एक हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एक ७१ वर्षाचे आजोबा शेतात पाणी चालू करण्यासाठी गेले ते परतलेच नाही. शोधाशोध केल्या नंतर मात्र त्याची दुचाकी शेताच्या बाजूला सापडली. तसेच शरीराचे तुकडे शेताच्या बाजूला विखुरलेलक्या स्थितित सापडले.

मराठवाड्यातील दुष्काळ भागातील लातूर जिल्ह्यामध्ये काही गावामध्ये दिवसा वीजपुरवठा होत नसल्याने रात्रीच्या वेळी शेतीची काम केली जातात. त्यामुळे मयत ७१ वर्षीय बशीर शेख हे सोमवारी रात्री ते नेहमीप्रमाणे बॅटरी घेऊन दुचाकीवरुन शेताकडे गेले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, तरी ते घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांना काळजी वाटू लागली. घरच्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मयत शेख यांना शोधण्यासाठी कुटुंबीयांनी सुरुवात केली. कुटुंबीयांनी शेख यांचा शेताच्या आसपास आणि नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र काहीच पत्ता लागला नाही. मात्र दोन दिवसांनी बशीर यांच्या शरीराचे तुकडे शेतात आढळून आले. हात, पाय आणि मुंडके धडावेगळे होऊन विविध ठिकाणी पडले होते. हे शरीराचे तुकडे पाहून पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. तर आज दुपारी बशीर यांचे धड शेजारच्या शेतात विहिरीच्या भऱ्यावर आढळून आले. कायदेशीर प्रक्रिया करून बशीर यांच्या शरीराचे तुकडे कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

संजय राऊत म्हणातात, आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला

हत्या झालेली वीणा कपूर आणि जिवंत वीणा कपूर यामुळे उडाला गोंधळ

नेमाडपंथी पुरोगामी अज्ञानपीठ

समृद्धी महामार्गावर नागपूर-शिर्डी, नागपूर-औरंगाबाद एसटी सेवा सुरू

बशीर मदारी शेख यांचा मृतदेह ज्या पद्धतीने तुकड्या तुकड्यात सापडला त्यावरून हा खून होता की हिंस्र पशूने हल्ला यावरून गावकऱ्यांमद्धे शंकेची झोड उठू लागली. तसेच हिंस्त्र पशुनी आपले खाद्य बनविले अशा शंका कुशंकांना उधाण आले होते. त्यामुळे वन्य जीव विभागाचे पथकाने ही घटनास्थळाची पाहणी केली. मात्र प्राथमिक अंदाजानुसार बशीर यांचा खून झाला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे. तसेच मयत बशीर शेख यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, दोन सूना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे बाभळगाव पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा