भारतात फसवणुकीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. एका ७० वर्षीय व्यावसायिकावर ७१ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष न्यायालयाने गुरुवारी त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली. या निकालात सुमारे ७१ लाख रुपये थकीत असलेल्या गुंतवणूकदारांची यादी करण्यात आली. प्रत्येकाकडे १० लाख ते १ लाख रुपयांपर्यंतची थकबाकी आहे. त्याच्यावर एका योजनेद्वारे १५ गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये त्याने २४ टक्के परतावा देण्याचे वचन दिले होते.
दोषी सुरेश शेट्टी आणि त्याची कंपनी ओम साई कॅपिटल लीजिंग अँड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आणि ह्या सकट थोडी रक्कम नुकसानभरपाई म्हणून गुंतवणूकदारांमध्ये समान प्रमाणात वितरित केली जाईल. विशेष न्यायाधीश एम.जी.देशपांडे म्हणाले, ” आरोपींनी बनवलेल्या बनावट गुंतवणूक योजनेत आंधळेपणाने त्यांची आयुष्यभराची बचत गुंतवली होती. अभियोग पक्षाच्या साक्षीदारांचे ठोस पुरावे आणि कागदपत्रे यावरून हा गुन्हा सिद्ध झाला आहे.”
हे ही वाचा :
भिवंडीत सराईत गुंड गणेश कोकाटेवर अज्ञात गुंडाचा गोळीबार
मुलानेच ७० वर्षीय आईची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, पण
हॉटेलमध्ये शिजला कापड व्यवसायिकाच्या हत्येचा कट
नाशिककरांची ८ तारीख ठरली ‘अपघाताची’
न्यायालयाने शेट्टी आजारी असल्याचे मानले आणि असे निरीक्षण नोंदवले. एमपीआयडी कायद्याचा उद्देश ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करणे असल्याने शेट्टी साठी कठोर शिक्षेचा उपयोग होणार नाही. परंतु विशेष न्यायाधीश म्हणाले की शिक्षा ठोठावायची आहे जेणेकरून योग्य संदेश जनतेपर्यंत पोहोचेल. न्यायाधीश असे ही म्हणाले की शेट्टी ने वाढीव व्याज दर आणि महागडे बक्षिश देण्याचे वचन देऊन गुंतवणूकदारांकडून पैसे लुबाडले.