मोबाईल चार्जिंगच्या नादात ब्रेकच्या जागी दाबले एक्सलरेटर आणि

सात जण झाले जखमी

मोबाईल चार्जिंगच्या नादात ब्रेकच्या जागी दाबले एक्सलरेटर आणि

कारमध्ये मोबाईल चार्जिंगला लावत असतांना अचानक कार सुरू झाली आणि त्याने कार थांबविण्यासाठी त्याने ब्रेकच्या जागी एक्सलेटर दाबल्याने भीषण अपघात होऊन या अपघातात ७ जण जखमी झाले आहे. जखमींना तात्काळ राजवाडी रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी घाटकोपर पूर्व या ठिकाणी अपघात झाला असून याप्रकरणी ४२ वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

स्पाइसजेटवरील निर्बंध २९ ऑक्टोबरपर्यंत

लष्करातून ब्रिटीश काळातील चिन्हे पुसणार

पुन्हा आदिलशाही, निजामशाही, मुंबई तोडण्याची भाषा, मर्द, कोथळे आणि ढोकळे

आता रतन टाटा पीएम केअर फंडाचे विश्वस्त; विरोधकांची बोलती बंद

 

राजू रामविलास यादव (४२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजू हा रिक्षा चालक असून कामराज नगर घाटकोपर पूर्व येथे राहण्यास आहे. राजू हा बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गारोडिया नगर घाटकोपर पूर्व येथे रिक्षा स्टँड जवळ रिक्षा उभी करून उभा होता, जवळच हुंदायी ऐसेन्ट ही टुरिस्ट कार प्रवासी भाडे घेण्यासाठी उभी होती. राजू याच्या मोबाईल फोन ची चार्जिंग कमी असल्यामुळे त्याने टुरिस्ट कारच्या चालक सीटजवळ असलेल्या चार्जिंग पॉईंट येथे मोबाईल फोन चार्जिंगला लावत असतांना कार सुरू होऊन पुढे गेली. राजू याने कार थांबविण्यासाठी ब्रेक दाबले परंतु त्याचा पाय एक्सलेटरवर पडून कार सुसाट निघाली तीन रिक्षा आणि पादचाऱ्यांना धडक देत ५० मीटर अंतरावर जाऊन थांबली.

या अपघातात शाळकरी मुले आणि दोन पादचारी आणि रिक्षा चालक असे मिळून ७ जण जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी राजावाडी रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले असून सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघात प्रकरणी पंतनगर पोलिसानी राजू यादव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version