आसाममध्ये भीषण अपघातात इंजीनियरिंगच्या ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

गुवाहाटीतील जलुकबारी येथील डीसीपी कार्यालयासमोर मध्यरात्री हा भयंकर अपघात झाला.

आसाममध्ये भीषण अपघातात इंजीनियरिंगच्या ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

आसामच्या गुवाहाटीमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात इंजिनिअरिंगच्या ७ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुवाहाटी शहरातील जलुकबारी भागात झालेल्या यात अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार गुवाहाटीतील जलुकबारी येथील डीसीपी कार्यालयासमोर मध्यरात्री हा भयंकर अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओने ब्रॉयलर घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप व्हॅनला धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात ७ इंजिनियर विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री अपघातग्रस्त कार रस्ता दुभाजकाला धडकली आणि नंतर या कारने दुसऱ्या गाडीला धडक दिली. या गाडीचा वेग खूप जास्त असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा:

मोदींची झळाळी आणि अपशकुनी दिवाभीतांचे टोळके…

मणिपूरमधील हिंसाचारात ४० दहशतवादी ठार

शिक्षणविरोधी तालिबानच्या नाकावर टिच्चून ती झाली आयआयटी पदवीधर

आज कोण रचणार इतिहास? गुजरात की चेन्नई?

आसाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाव्या सत्रला हे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. वसतिगृह क्रमांक २ मधील हे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.निओर डेका, उपांशु शर्मा, कौशिक बरुआ, कौशिक मोहन, राज किरण भुइयां, एमोन बरुआ, अरिंदम भौवाल अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर या अपघातात इतर ६ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

 

मृण्मय बोरा, अर्नव चक्रवर्ती आणि अर्पण भुइयां घायल अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तर विद्यार्थ्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून रुग्णालयात शवविच्छेदन अहवालासाठी पाठवून देण्यात आले आहे.

Exit mobile version