वसईत ट्रकचोराला केले जेरबंद

हा आरोपी वसई-विरार महानगरपालिकेच्या (व्हीव्हीएमसी) कचऱ्याचे ट्रक चोरून भंगार विकायचा.

वसईत ट्रकचोराला केले जेरबंद
गुरुवारी गुन्हे शाखाने एका ६५ वर्षीय ट्रक चोराला अटक केले आहे. हा आरोपी वसई-विरार महानगरपालिकेच्या (व्हीव्हीएमसी) कचऱ्याचे ट्रक चोरून भंगार विकायचा. ह्या गुन्ह्यासाठी त्याच्यावर कडक कारवाही करण्याचे आदेश आले आहेत.
आरोपी – बैजनाथ लांडगे असून त्याला  ‘कचरे वाला’ म्हणूनही ओळखले जात होते. २० वर्षांहून अधिक काळ नागरी संस्थेचा चालक म्हणून सेवा केल्यानंतर तो सेवानिवृत्त झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून वसईतून महापालिकेचे चार कचऱ्याचे ट्रक चोरीला गेल्याची नोंद आहे. पोलिसांनी ६०० हून अधिक वाहतूक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजचे अनुसरण केले. फुटेज वरून हे कळण्यात आले की प्रत्येक ट्रक लुटल्यानंतर त्याच मार्गाचा वापर करून एक व्यक्ती दर १५ दिवसात एक ट्रक चोरून नेत आहे.

हे ही वाचा:

सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रार ताब्यात

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी सापडल्या सोन्याच्या खाणी

१४ वर्षे गायब असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक करताना ओळखली ही खूण

मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन महिलेने केले भारताचे कौतुक !

“माहितीनुसार हा चोर ट्रक वसई ते वाडा पर्यंत न्यायचा आणि तेथून जव्हारला जायचा. नंतर नाशिक गाठून तो औरंगाबादकडे धाव मारायचा. त्यामुळे आम्ही परभणीत पोहोचले जेथे लांडगे थांबले होते “, असे वसई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहूराज रानवडे यांनी सांगितले. ट्रकचे इंजिन, टायर इत्यादी चांगले भाग काढून इतर वाहनांना बसवल्यानंतर तो ट्रक विकायचा. प्रत्येक ट्रक मोडून काढल्यानंतर त्याला किमान ३ लाख रुपये मिळायचे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) कचऱ्याच्या ट्रकमध्ये जीपीएस ट्रॅकिंग असल्याची माहिती लांडगे याना माहित होती. म्हणून त्यांनी  वसई-विरार आणि नवी मुंबई महानगरपालिकेतील कचऱ्याच्या ट्रकांकडे  लक्ष्य वेधले. वसईला तोच अप-रात्री फिरून गपचूप ट्रक चोरायचा अशी माहितीदेखील समोर आली आहे.
Exit mobile version