अरबी भाषा शिक्षकाकडून ८ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

पोलिसांनी केली अटक

अरबी भाषा शिक्षकाकडून ८ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

अरबी भाषा शिकण्यासाठी जाणाऱ्या ८ वर्षाच्या मुलीवर अरबी शिक्षकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना शिवडी परिसरात घडली. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी ६५ वर्षीय अरबी भाषा शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

शिवडी येथे आपल्या कुटुंबियांसह राहणारी ८ वर्षीय पीडिता ही अरबी शिकण्यासाठी घरापासून काही अंतरावर असलेल्या ६५ वर्षांच्या अरबी शिक्षकाकडे जात होती. नराधम अरबी शिक्षकाने पीडितेच्या असाहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर लैगिंक अत्याचार केला.  याची वाच्यता कुठेही करू नकोस म्हणून तिला धमकावले.

घरी आलेल्या पीडितेच्या पोटात दुखू लागले व तिला अधिक वेदना होऊ लागल्यामुळे आईने तिच्याकडे विचारपूस केली. परंतु पीडित मुलगी घाबरल्यामुळे आईने तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता तिने घडलेला सर्व प्रकार आली सांगितला. आईने ताबडतोब मुलीला उपचारासाठी नजीकच्या आणून तिच्यावर उपचार करून थेट शिवडी पोलीस ठाणे गाठले.

हे ही वाचा:

भिडेंचे वक्तव्य विक्षिप्त; पण त्याविरोधातल्या मागण्या अवास्तव

मुंबई विमानतळावर पोलंडच्या नागरिकाकडे सापडले हेरॉईन

कोहली ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू!

भविष्यातील पिढ्या घडविण्यासाठी आरक्षणाबाबतचा निर्णय महत्त्वाचा

 

शिवडी पोलीस ठाण्यात तिने अरबी शिक्षक मोमरेज सरदार याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून ६५ वर्षीय शिक्षकाविरुद्ध बाल लैगिंk प्रतिबंध कायदा (पॉस्को) आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून शिक्षक मोमरेज सरदार याला अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version