“उचे लोगो कि उंची पसंद” हा प्रसिद्ध डायलॉग तर माहीतच असेल, पण या डायलॉग प्रमाणे व्यापाऱ्याने हौशीपोटी थेट जपान हुन आलिशान कार मागवली आहे. मात्र या आलीशान कारसाठी दिलशान रीतसर शुल्क भरले. त्यानंतर गाडीचे कागदपत्रे, तसेच आलिशान गाडीची आयात शुल्काची पावतीच बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या व्यावसायिकाला नको ते मनस्ताप सहन करावा लागत आहे. या घटनेत संबंधित मध्यस्थींचा काही समावेश आहे का ? हे तपासणी नंतर कळू शकेल. तसेच या व्यावसायिकाने संबंधित घोटाळ्यातील तपास थेट केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीबीआय कडे प्रकरण सोपविण्यात आले आहे.
संबंधित घटनेमध्ये मुंबईमधील एका बांधकाम व्यावसायिक अमित गुप्ता यांनी एक आलिशान चारचाकी कार खरेदी करायची होती. त्यासाठी गुप्ता यांनी त्यांच्या परिचयातील एका व्यक्तीने त्यांची भेट आसिफ मोहम्मद कुरेशी, जुबेर कुरेशी इलियास खान आणि अमित चौधरी यांच्याशी भेट घालून दिली. तसेच या तिघांनी स्टालिन मोटार कॉर्पोरेशन या गाड्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या कंपनीकडे एक आलिशान चार चाली विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. गुप्ता यांच्याशी बोलणी करून ६४ लाख रुपयांचा सौदा मंजूर केला.
स्टालिन मोटार कॉर्पोरेशन या गाडीचा सौदा पूर्ण झाल्या नंतर थेट आयात जपानहुन या आलिशान गाडीची खरेदी केली. तसेच या आलिशान गाडीची संपूर्ण आयात शुल्क ही भरल्याचे गुप्ता यांना सांगितले. संबंधित कार बद्दल या तिघांना ३ लाख रुपयांचे कमिशन ही देण्यात आले होते. मात्र काही दिवसांनी तपासाच्या अनुषंगाने महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) च्या अधिकाराऱ्यांनी संबंधित वाहनाचे सीमा शुल्क तसेच आयात भरले नसल्याने आलिशान गाडी जप्त करण्यात आली.
हे ही वाचा
नातेवाईकानेच लंपास केले ७५ लाखांचे सोने
रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’
नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले
‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’
महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) च्या अधिकाऱ्यांना आलिशान गाडीची कागदपत्राची पडताळणी केली असता, गाडीची कागद पत्र आणि पावत्या बनावट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणांचा अंदाज घेत गुप्ता यांनी आपली फसवणूक झाल्याचे समजताच खार पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला. तसेच संबंधित घोटाळ्यासंबंधित रिट याचिका देखील दाखल केली होती.