राजस्थानमधील टोंक जिल्ह्यात बुधवारी रात्री अज्ञात व्यक्तींचा समूह आणि पोलिसांच्या गटामध्ये झालेल्या संघर्षात पोलिसांच्या वाहनांसह सुमारे आठ चारचाकी वाहने आणि दोन डझनहून अधिक दुचाकींची तोडफोड करण्यात आली शिवाय ही वाहने पेटवून देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांच्या समर्थकांनी केलेल्या आंदोलनादरम्यान देवळी- उनियारा येथील सामरावता गावात ही घटना घडली. नरेश मीणा यांनी गावातील मतदान केंद्रावर उपविभागीय दंडाधिकारी (SDM) यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलीस नरेश मीणा यांच्या अटकेच्या प्रयत्नात असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ निर्माण केला.
काही आंदोलकांनी दगडफेक करत अनेक वाहने पेटवून दिली. अतिरिक्त फौजफाटा आल्यावरच परिस्थिती नियंत्रणात आणता आली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. टोंक जिल्ह्यातील देवली उनियारा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांना पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता काल रात्री सामरावता गावात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, गोंधळ, दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत ६० जणांना अटक करण्यात आली आहे.
Rajasthan: 60 people have been arrested so far in the case of ruckus, stone pelting, and arson incident in Samravata village last night, when police tried to apprehend Naresh Meena, independent candidate for Deoli Uniara assembly constituency by-polls in Tonk district, after he…
— ANI (@ANI) November 14, 2024
टोंकचे एसपी विकास सांगवान म्हणाले की, “सामरावता गावात काही लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एसडीएम, तहसीलदार, अतिरिक्त एसपी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी या ठिकाणी भेट दिली. अचानक त्यांनी एसडीएमला मारहाण केली त्यानंतर अतिरिक्त एसपींनी तात्काळ नरेश मीणा यांना त्या ठिकाणाहून हटवले. मीणा यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल,” अशी माहिती त्यांनी दिली.
हे ही वाचा :
झारखंड निवडणूक; पहिल्या टप्प्यात ६४ टक्के मतदान!
जोगेश्वरीत उबाठा उमेदवार अनंत (बाळा) नर कडून गुंडगिरी, महिलांचा विनयभंग!
कोविडकाळात घरात बसणारे उद्धव ठाकरे हे देशातील एकमेव मुख्यमंत्री
मतपेढीचे, जातीचे राजकारण करणा-यांना थारा देऊ नका
या घटनेनंतर राजस्थान प्रशासकीय सेवा (RAS) असोसिएशनच्या सदस्यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन नरेश मीणा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. असोसिएशनचे अध्यक्ष महावीर खराडी यांनी एएनआयला सांगितले की, “ज्या प्रकारे अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी एरिया मॅजिस्ट्रेट ड्युटीवर असलेल्या एसडीएमला मारहाण केली. त्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. त्यांना तातडीने अटक करण्यात यावी.” असोसिएशनच्या सरचिटणीस नीतू राजेश्वर म्हणाल्या की, “असोसिएशनने हा मुद्दा सरकारच्या विविध स्तरांवर मांडला आहे. आम्ही कारवाईची मागणी केली आहे आणि सर्व बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.”