करोना काळात जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटी रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता महत्वाची माहिती समोर आली असून ईडीने न्यायालयाने दाखल केलेल्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे केले आहेत.
कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीने आठ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात ईडीने म्हटले आहे की, करोना काळात या कोविड केंद्रांवर फक्त निम्मे कर्मचारी कामावर होते. मात्र, १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती दाखविण्यात आली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर रुग्णांची काळजी घेण्याचा भार वाढला होता.
वरळी आणि दहिसर या दोन केंद्रांचे कंत्राट २०२० मध्ये लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला देण्यात आले होते. कंपनीच्या चार भागीदारांनी मिळून बेकायदेशीरपणे पैसे कमावल्याचा आरोप आहे. संजय शहा, राजीव साळुंखे, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजित पाटकर आणि हेमंत गुप्ता यांचा समावेश आहे. यामध्ये या कॉन्ट्रक्टचा मोबदला म्हणून बीएमसी अधिकारी आणि नेत्यांना ६० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे गोल्ड बार, सोन्याची बिस्किटे आणि नाणी देण्यात आल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. मिळालेल्या पैशातून संजय शहा यांनी सोने खरेदी केले. नंतर हे सोने सुजित पाटकर यांना देण्यात आले आणि पुढे हे महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये वाटण्यात आले. वैद्यकीय कर्मचार्यांच्या संख्येवर दुर्लक्ष करण्यासाठी पाटकर यांनी अधिकाऱ्यांना रोख रक्कम आणि इतर महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या.
हे ही वाचा:
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा रद्द
‘जय श्री राम’चा नारा देण्यास नकार देणाऱ्या तरुणाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक
न्यूयॉर्कमध्ये पूर; रस्त्यांना आले नद्यांचे रूप
आशियाई स्पर्धेत नेमबाजांची रौप्य पदकाला गवसणी
जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२२ या काळात वरळी आणि दहिसर या दोन कोविड सेंटरमध्ये अनियमितता झाल्याचे ईडीने सांगितले आले. तसेच या कालावधीत ३२.४४ कोटी रुपये बेकायदेशीररित्या कमावले गेले. शुक्रवारी विशेष न्यायालयाने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचीही दखल घेतली. ज्यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.