30 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरक्राईमनामाकेळव्याच्या समुद्रात सहा जण बुडाले; चार जणांचा मृत्यू

केळव्याच्या समुद्रात सहा जण बुडाले; चार जणांचा मृत्यू

Google News Follow

Related

पालघर जिल्ह्यातील केळवे येथील समुद्रात सहा जण बुडाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. केळवे समुद्रकिनाऱ्यावर सहा जण बुडाल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली. यापैकी दोघांना वाचवण्यात यंत्रणांना यश आले आहे. तर चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. बुडालेले चार जण नाशिकमधील होते.

समुद्रात पोहण्यासाठी उतरलेली दोन स्थानिक लहान मुले बुडत होती. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले नाशिकचे हे चार तरुणही समुद्रात बुडाले आहेत. त्यापैकी एकाला पोहता येत असल्याने तो बचावला. तर एका स्थानिक मुलाला वाचवण्यात यश आले आहे. बचावलेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिकांनी युद्धपातळीवर शोध घेत चारही मृतदेह बाहेर काढले.

पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या केळवे समुद्रकिनाऱ्यावर नाशिकमधील कॉलेज तरुणांचा मोठा ग्रुप पिकनिकसाठी आला होता. यावेळी दोन स्थानिक लहान मुले पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरली होती. ही मुले बुडू लागल्याने नाशिकच्या या तरुणांचे लक्ष बुडणाऱ्या मुलांकडे गेले. मुलं बुडत आहेत हे लक्षात आल्यानंतर यातील चार तरुण या मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात गेले. मात्र हे चौघेही पाण्यात बुडाले. या चौघांपैकी एक तरुण पोहणारा असल्यामुळे तो बचावला आहे. तर बुडणाऱ्या एका लहान मुलालाही वाचवण्यात यश आले आहे.

हे ही वाचा:

अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा; या विषयांवर केली चर्चा

ठाकरे सरकाने सादर केलेला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बेआब्रू

स्थानिक व्यवसायिक आणि मच्छिमार मंडळींनी शोध मोहिम राबवत चारही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. घटनास्थळी पोलिसही दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा