सहा नक्षलवाद्यांना तेलंगणात कंठस्नान

सहा नक्षलवाद्यांना तेलंगणात कंठस्नान

तेलंगणा-छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवादी आणि पोलिस यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. या चकमकीत सहा नक्षलवादी मारले गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तेलंगणा पोलिसांनी या मोठ्या कारवाईत भाग घेतला होता. तेलंगणाच्या कोत्तागुडमचे पोलीस अधीक्षक सुनील दत्त यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली होती. चकमकीनंतर पोलिसांनी तातडीनं शोधमोहीम राबवली. त्यात घटनास्थळी सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून मोठ्या प्रमाणात हत्यारंही जप्त करण्यात आली आहेत.

किस्तराम पीएस सीमेवरील जंगलात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. एसपी सुनील दत्त यांनी म्हटलं की, हे तेलंगणा पोलीस, छत्तीसगढ पोलीस आणि सीआरपीएफ यांचं जॉईंट ऑपरेशन होतं. सकाळी १०:३० वाजता हे ऑपरेशन सुरु झालं होतं. घटनास्थळी शोधमोहीम सुरु असून पोलिसांकडून लगतच्या भागांत गस्त घालण्यात येत आहे.

तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये दोन आयईडी (स्फोटकं) मिळाल्यानंतर हा एन्काउंटर झाला. जिल्ह्यातील सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी हे आयईडी प्लांट बनवण्यात आले होते. पोलीस अहवालानुसार, नक्षलवादी आयईडीद्वारे सुरक्षा दलांना लक्ष्य करत आहेत, कारण त्यांना असलेला बस्तर आणि अबुजमाद भागातील स्थानिक लोकांचा पाठिंबा ओसरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

याआधी गुरुवारी झारखंडमधील चाईबासा जिल्ह्यात पोलिसांनी पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया (PLFI)चा ‘एरिया कमांडर’ बंधन टोप्नो याला सोगा टेकडीच्या जंगलातून शस्त्रास्त्रांसह अटक केली होती.

हे ही वाचा:

विधिमंडळात ‘सरकार हरवले आहे’ चे शर्ट

बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम आहे तरी कोण?

सोबत पुरुष असेल तरच महिलांना प्रवास; तालिबान्यांचा फतवा

जालन्यातील १२ कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमध्ये नक्षली कमांडरसोबत त्यांच्या काही साथीदारांचाही पाठलाग करण्यात आला. परंतु, त्यांनी त्याठिकाणाहून पळ काढला. अटक करण्यात आलेल्या नक्षली कमांडरवर अनेक गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी एक रायफल, बंदुकीच्या गोळ्या आणि इतर दारूगोळा जप्त केला आहे.

Exit mobile version