फेक संदेश पायी १ मिनिटात ६ लाख गमावले

मोबाईलवर आलेल्या लिंकमध्ये माहिती पुरवठा करताच मिनिटात लाखों रुपते घालवले

फेक संदेश पायी १ मिनिटात ६ लाख गमावले

मुंबईत सायबर गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असताना, त्यात अजून एक गुन्ह्यांची भर पडली आहे. बीआरसी येथे ‘स्टेनो ग्राफर’ पदावर काम करणाऱ्या एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच या व्यक्तीच्या मोबाईलवर ‘बँक खात्यावर पॅनकार्ड अपडेट न केल्यास तुमचे खाते बंद होईल.’ अशा स्वरूपाच्या संदेश त्यांना आला होता. सोबत एक लिंक ही देण्यात आली होती.

चेंबूर बीआरसी येथे अधिकारी वस्तीमध्ये राहणारे व्यक्ति स्टेनोग्राफर या पदावर कार्यरत आहेत. रविवारच्या दिवशी अनोळखी नंबर वरुण मोबाईलवर ‘प्रिय ग्राहक, तुमचे पॅनकार्ड अपडेट नसून ते अपडेट न केल्यास एसबीआय बँकेतील खाते बंद होईल.’ असे नमूद करण्यात आले होते. सोबत एक लिंक ही देण्यात आली होती. त्यामध्ये आपण माहीती भरू शकता असे मजकूर संदेशमध्ये देण्यात आले होते. संदेश पाहिल्यावर बिथरलेल्या स्टेनोग्राफर यांनी पॅनकार्ड व आधार कार्डचे सर्व माहिती त्यालिंक मध्ये पुरवली.

हे ही वाचा:

अपंग तरुणाने केले २ वर्षाच्या मुलीचे अपहरण

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार

रविवारच्या दिवशी मोबाईलवर संदेश पाहिल्यावर बिथरलेल्या स्टेनोग्राफर यांनी संदेशची कोणतीच पुष्टी न करताच आलेल्या लिंकवर बँकेसह पॅनकार्ड व आधारकार्डची सर्व माहिती पुरवली गेली असता, काही क्षणाच्या आतच त्यांच्या बँक खात्यातून १ मिनिटात ६ लाख २५ हजार रुपये विविध खात्यात वळते झाल्याचे संदेश त्यांच्या मोबाईलवर येऊ लागले. संदेश पाहिल्यावर त्यांनी तत्काळ बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला व ट्रॉम्बे पोलिस स्थानकात हा घटने विषयी तक्रार ही नोंदवली आहे.

Exit mobile version