सुशील कुमारला ६ दिवसांची पोलिस कोठडी

सुशील कुमारला ६ दिवसांची पोलिस कोठडी

भारताचा कुस्तीपटु सुशील कुमार याला काल अटक करण्यात आली होती. त्याला आज सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ४ मे रोजी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या वादावादित एका तरूण कुस्तीपटुच्या हत्येप्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.

काल सकाळी दिल्लीच्या मुंडका भागातून ३७ वर्षीय सुशील कुमारला अटक करण्यात आली होती. त्याच्यासोबत त्याचा सहकारी अजय (४८) याला देखील अटक करण्यात आली होती. सुशील कुमार ४ मेच्या प्रकरणानंतर फरार म्हणून घोषित करण्यात आला होता.

दिल्ली पोलिसांनी त्याला फरार म्हणून घोषित केल्यानंतर त्याची आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक करण्यास उपयुक्त माहिती देण्यावर १ लाख रुपये आणि ५० हजार रुपये असे इनाम देखील ठेवले होते.

हे ही वाचा:

‘ठाकरे सरकारचा पॅकेज देण्यावर विश्वास नाही, घेण्यावर आहे’

अनिल परबांनी शेतजमिनीवर बांधले अनधिकृत रिसॉर्ट

अभाविप कार्यकर्त्याच्या घरावर तृणमूलच्या गुंडाचा हल्ला

‘इंडियन व्हेरीअंट’ म्हणणाऱ्या कमलनाथांवर गुन्हा

अटक केल्यानंतर त्याला जिल्हा न्यायाधीश दिव्या मल्होत्रा यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी सुमारे अर्धा तास चाललेल्या चौकशी नंतर पोलिसांनी अधिक चौकशीसाठी १२ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती.

या वेळी सरकारी वकिल अतुल श्रीवास्तव यांनी सांगितले की, या गुन्हेगारी कृत्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी सुशील कुमारची अधिक चौकशी करणे आवश्यक आहे. त्यानंतर न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Exit mobile version