मुंबई सीमाशुल्क विभागाकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान, सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल १२ किलो सोनं जप्त केलं आहे. या सोन्याची किंमत जवळपास ६ कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
एका विशेष बेल्टच्या आतील भागात लपवून हे सोनं विदेशात घेऊन जाण्यात येत होतं. याप्रकरणी सूदान येथून आलेल्या सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून ६ कोटी किंमतीचे १२ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. सध्या याबाबत चौकशी केली जात असून मुंबईत हे सोन्याचे तस्कर कोणाच्या संपर्कात होते, याची चौकशीही सुरू आहे.
हे ही वाचा:
प्रभादेवीत झालेल्या राड्याप्रकरणी शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांना अटक
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे- ठाकरे समर्थक आमनेसामने, गोळीबार झाल्याचा दावा
‘याकुब मेमनचा भाऊ रौफसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या?’
राहुल गांधींच्या ४१ हजार रुपयांच्या टी शर्टची चर्चा
यापूर्वी आठवडाभरापूर्वीच मुंबई विमानतळावर मस्कतहून विमानाने आलेल्या एका प्रवाशाने कंबरेच्या पट्ट्यात दीड कोटींचं अडीच किलो सोनं लपवून आणलं होतं. मात्र, या प्रवाशाने सुरक्षा यंत्रणेच्या भीतीने शौचालयातील डस्टबिनमध्ये सोनं फेकलं. यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या.