जन्मठेपेच्या कैद्याला पोलिसांनी दिली ‘मधली सुट्टी’

शिक्षा भोगत असताना पत्नी, मुलासोबतचे घरी काढलेले फोटो झाले व्हायरल

जन्मठेपेच्या कैद्याला पोलिसांनी दिली ‘मधली सुट्टी’

बिहारमधील गोपालगंजचे जिल्हाधिकारी जी कृष्णय्या यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले नेते आनंद मोहन यांना पोलीस कोठडीत घरी जाण्याची परवानगी दिल्याप्रकरणी सहा पोलिसांवर सोमवार, १५ ऑगस्ट रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सहरसा पोलीस अधीक्षक लिपी सिंग यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.

दरम्यान हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेले आनंद मोहन यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये आनंद मोहन हे त्यांची पत्नी लवली आनंद आणि मुलगा चेतन आनंदसोबत दिसत आहेत. १२ ऑगस्टला हे फोटो समोर आले होते.

दरम्यान, आनंद मोहन यांना पोलिस कोठडीत हजर करण्यासाठी पाटण्यात आणण्यात आले होते. मात्र, आनंद मोहन पाटण्यातील त्यांच्या निवासस्थानी पोहचले होते. यावेळी आनंद मोहन यांच्यासोबत त्यांची पत्नी लवली आनंद आणि आरजेडी आमदार मुलगा चेतन आनंदही उपस्थित होते. याप्रकरणी सहा पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

बस दरीत कोसळली, ६ जवान शहीद

रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेससाठी गुगलवर गर्दी

शिवमोग्गामध्ये सावरकर वि. टिपू सुलतान

७५ विधवा महिलांनी फडकावले ७५ राष्ट्रध्वज

आनंद मोहन यांना गोपालगंजचे तत्कालीन जिल्हाधिकारी कृष्णय्या यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. हे फोटो व्हायरल झाल्याने बिहार पोलिस आणि नव्या महाआघाडी सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Exit mobile version