दिल्ली: ‘ट्रान्सजेंडर’ असल्याचे भासवत भिक मागणाऱ्या सहा घुसखोर बांगलादेशींना अटक!

घुसखोरांकडून सहा मोबाईल जप्त, पोलिसांकडून पुढील कारवाई सुरु

दिल्ली: ‘ट्रान्सजेंडर’ असल्याचे भासवत भिक मागणाऱ्या सहा घुसखोर बांगलादेशींना अटक!

दिल्लीच्या जहांगीरपुरी भागातून पोलिसांनी सहा संशयित बेकायदेशीर बांगलादेशींना अटक केली, जे महिलांच्या वेशात होते आणि त्यांची ओळख लपविण्यासाठी ‘ट्रान्सजेंडर’ असल्याचे भासवत होते. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींनी आपली ओळख लपवण्यासाठी आणि स्थानिक ट्रान्सजेंडर समुदायात मिसळण्यासाठी त्यांनी ‘किरकोळ शस्त्रक्रिया’ आणि ‘हार्मोनल उपचार’ देखील केले होते.

बांगलादेशातील त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी ते एका बंदी घातलेल्या ॲपचा वापर करत असल्याचे आढळून आले, असे पोलिसांनी सांगितले. सर्व सहा बेकायदेशीर बांगलादेशींना हद्दपारीच्या कारवाईसाठी आर. के. पुरम येथील परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडे (FRRO) सुपूर्द करण्यात आले.

मोहम्मद झकारिया मोइना खान (२४), सुहाना खान (२१), अखी सरकार (२२), मोहम्मद बाओइझेद खान (२४), मोहम्मद राणा उर्फ ​​लोबाली (२६) आणि जॉनी हुसेन (२०) अशी अटक केलेल्या घुसखोर बांगलादेशींची नावे आहेत.

हे ही वाचा : 

पश्चिम बंगाल: मोथाबाडीत तणाव कायम

मुजफ्फरनगरचे नाव बदलून ‘लक्ष्मी नगर’ ठेवा

मां मुंडेश्वरी धाममध्ये माता मुंडेश्वरीचा खास श्रंगार

धीम्या ओव्हर गतीसाठी हार्दिक पांड्याला दंड

पोलिसांनी सांगितले की, बांगलादेशातील बरगुना, गाजीपूर, मदारीपूर, सिराजगंज, पबना आणि नौगाव जिल्ह्यातील हे सर्व रहिवासी आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी सांगितले की तस्करांच्या मदतीने बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता. पोलिसांनी त्यांच्याकडून ६ मोबाईल फोन जप्त केले आहेत. तसेच पुढील कारवाई सुरु आहे.

दिल्लीचे गृहमंत्री आशिष सूद यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, एकाही बेकायदेशीर घुसखोराला राष्ट्रीय राजधानीत राहू दिले जाणार नाही. पोलिसांच्या सहकार्याने, बांगलादेशी घुसखोरांसह सर्व बेकायदेशीर घुसखोरांवर आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांवर सुनियोजित कारवाई केली जाईल. दिल्लीतून बेकायदेशीर घुसखोरांना हटविण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. राष्ट्रीय राजधानीत लवकरच सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी ग्वाही गृहमंत्री आशिष सूद यांनी दिली.

करियर - AI = ??? |Amit Kale |  डॉ. दीपक शिकारपूर

Exit mobile version