25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामामुंबईतून ६ घुसखोर बांगलादेशीना अटक, निवडणुकीत झाले मतदान!

मुंबईतून ६ घुसखोर बांगलादेशीना अटक, निवडणुकीत झाले मतदान!

मुंबई पोलिसांकडून अधिक

Google News Follow

Related

भारतात घुसखोरी करून राहणाऱ्या ६ बांगलादेशी नागरिकांना मुंबईतील विविध परिसरातून अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या सहा घुसखोर बांगलादेशी पैकी दोघे जण मागील २५ वर्षापासून मुंबईत राहण्यास होते व त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केल्याची माहिती त्यांच्या चौकशीत समोर आली आहे.

रुबीना अबूहसन शेख, मोहम्मद बिलप मोहम्मद सहाबुद्दीन शेख, मोहम्मद मसुद मतीन रेहमान राणा, मोहीन हयात बादशाह शेख, युनूस आक्काश शेख आणि ताहीर गफुर शेख अशी या सहाजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना स्थानिक न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.अटक करण्यात आलेले घुसखोर बांगलादेशीयांना मुंबईतील कफपरेड, जोगेश्वरी,गोरेगाव, मानखुर्द आणि ट्रॉम्बे येथून अटक करण्यात

मानखुर्द परिसरात काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची मानखुर्द पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीसानी जनतानगर, नूरी मशिदीजवळ साध्या वेशात पाळत ठेवून रुबीना या ३५ वर्षांच्या महिलेस ताब्यात घेतले. चौकशीत ती बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. गेल्या २४ वर्षांपासून ती भारतात वास्तव्यास होता. घरकाम करुन ती स्वतचा उदरनिर्वाह चालवत होती.

हे ही वाचा : 

ठाण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २५ बांगलादेशींना अटक!

ताजमहालपेक्षा लोकांना भावतेय अयोध्येचे श्रीराममंदिर!

राहुल गांधी म्हणतात, सूर्यवंशी यांची हत्या दलित म्हणून…भातखळकर म्हणाले, ही तर गिधाडे!

भारताने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवावे!

रुबिना हिने बोगस कागदपत्रांच्या आधारे भारतीय असल्याचे ओळखपत्र तयार केले होते त्या आधारे तीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केल्याचे तपासात समोर आली.दुसऱ्या कारवाईत कफ परेड पोलिसांनी मोहीन हयात शेख याला ताब्यात घेतले. मोहीन हा कफ परेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, विठ्ठलवाडी परिसरात राहत होता. तिथे तो मौलाना म्हणून काम करत होता. १९९० साली तो भारतात आला होता. परळ, मुंब्रा, घाटकोपर येथे राहिल्यानंतर तो गेल्या काही वर्षांपासून कफ परेड परिसरात वास्तव्यास होता.

यादरम्यान त्याने भारतीय नागरिक असल्याने काही दस्तावेज बनविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मोहीन हयात शेख (५२) याने देखील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केले होते अशी माहिती समोर आली आहे. अन्य एका कारवाईत ट्रॉम्बे पोलिसांनी ताहीर शेख या बांगलादेशी नागरिकाला अटक केली. तो महाराष्ट्रनगरात राहत होता. २० वर्षांपूर्वी तो बांगलादेशातून भारतात आला होता. तेव्हापासून तो मानखुर्द येथे वास्तव्यास होता.

अन्य तीन कारवाईत अंधेरीतील जुहू गल्ली, सलामिया हॉटेल येथून मोहम्मद बिलप, गोरेगाव फिल्मसिटी रोड, संतोषनगर परिसरातून मोहम्मद मसुद, जोगेश्वतील लोटस पेट्रोलपंप परिसरातून युनूस शेख या तिघांना स्थानिक पोलिसांच्या एटीएस पथकाने अटक केली. यातील मोहम्मद बिलप हा प्लंबर असून तो तीन महिन्यांपूर्वी बांगलादेशातून भारतात आला होता. तेव्हापासून तो वसई येथे वास्तव्यास होता. सध्या तो वसईतील कोळीवाडा, साईदत्त नगरात राहत होता. अन्य एक नागरिक युनूस हा हादेखील वसईतील कोळीवाड्यातील रहिवाशी आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा