रेल्वे स्थानकावर जीवंत स्फोटके सापडल्याने नागपूरमध्ये खळबळ

रेल्वे स्थानकावर जीवंत स्फोटके सापडल्याने नागपूरमध्ये खळबळ

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये जीवंत स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. सोमवार, ९ मे रोजी नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर ही स्फोटके आढळून आली. रात्री ८ च्या सुमारास ही स्फोटके सापडली असून या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे.

नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या पोलीस बुथजवळ एक संशयास्पद बॅग आढळून आली. या बॅगेत जिलेटीनच्या काड्या होत्या. एकूण ५६ जिलेटीनच्या काड्या या बॅगेत भरण्यात आल्या होत्या. तर त्यासोबतच एक कमी क्षमतेचे डिटोनेटर आणि बॉम्बसदृश्य वस्तू सुद्धा होती. जिलेटीनच्या सर्व काड्या या एका सर्किटमध्ये बांधण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा:

‘उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची ट्युशन घ्यावी’

श्रीलंकेच्या पंतप्रधांनांनी दिला राजीनामा

सदावर्ते यांची नवी संघटना, ‘एसटी कष्टकरी जनसंघ’

शिवसेनेची लिलावतीत दादागिरी; नर्सेस, डॉक्टर, वॉर्ड बॉयना धमकावले

या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच तपास यंत्रणा सक्रिय झाल्या. पोलीस आणि बॉम्ब नाशक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचत त्यांनी ही बॅग आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर बॉम्बनाशक पथकाच्या विशेष गाडीतून ही बॅग नागपूर पोलीस मुख्यालय परिसरा नेण्यात आली आणि तिथे या स्फोटकांना निष्क्रिय करण्या आले.

पण ही स्फोटके नागपूर रेल्वे स्थानकावर कशी आली? कोणी ठेवली? का ठेवली? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलीस सध्या या सर्व घटनेचा तपास करत आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असून कायमच दहशतवाद्यांच्या रडारवर राहिले आहे. नागपूरमध्ये रा.स्व.संघाचे मुख्यालय, दिक्षाभूमी, विधानभवन अशा अनेक अतिमहत्वाच्या वास्तू आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये अशाप्रकारची जीवंत स्फोटके मिळणे ही अतिशय गंभीर बाब असल्याचे म्हटले जात आहे.

Exit mobile version