27 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरक्राईमनामापुण्यातून पकडलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून ५०० जीबी डेटा, ड्रोन फुटेज जप्त

पुण्यातून पकडलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून ५०० जीबी डेटा, ड्रोन फुटेज जप्त

ड्रोनचे फूटेज फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे

Google News Follow

Related

महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने या महिन्याच्या सुरुवातीला पुण्यात अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडून ५०० जीबी डेटा आणि ड्रोन फुटेज प्राप्त करण्यात आले आहे.  एजन्सीने पुण्यातील कोंढवा भागातील दहशतवादी संशयितांच्या भाड्याच्या फ्लॅटमधून स्फोटके बनवण्यासाठी वापरलेले इलेक्ट्रॉनिक सर्किट तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून ५०० जीबी डेटा जप्त केला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

 

 

एटीएस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “आम्हाला दोन दहशतवादी संशयितांच्या घरातून एक ड्रोन कॅमेरा सापडला आहे आणि स्फोटक बनवण्यासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक सर्किट देखील जप्त केले आहे.” “ते नेमके काय करायचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही त्यांच्या उपकरणांमधून जवळपास ५०० जीबी डेटा जप्त केला आहे. हा डेटा फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आला आहे,” असेही त्यांनी सांगितले.

 

 

दहशतवादी संशयितांनी ड्रोनचा वापर शूटिंगसाठी (व्हिडिओ/इमेज) केला, पण ते वापरून त्यांनी कोणते ठिकाण रेकॉर्ड केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे ते म्हणाले. “त्यांनी ड्रोनचा वापर करून कोणत्या ठिकाणी शूट केले ते फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होईल. आम्हाला ड्रोन फुटेज मिळालेले नाही कारण ते फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवले आहे,” अधिकाऱ्याने पुढे सांगितले.

 

 

पोलिसांनी आधी सांगितले की त्यांनी दोघांकडून एक तंबू जप्त केला होता. याबाबत विचारले असता, एटीएस अधिकाऱ्याने सांगितले की, “दोन्ही संशयितांनी हॉटेलमध्ये राहणे टाळले आणि ते तंबू मध्ये राहत होते. त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी भेट दिली होती.”

हे ही वाचा:

आरपीएफ जवानाने जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये अधिकाऱ्यासह चार जणांना घातली गोळी

चीपपुरवठ्यात भारत चीनला निश्चित मागे टाकेल

दारूसाठी पाच रुपये कमी दिल्याने दुकानदाराने केलेल्या मारहाणीत एकाच मृत्यू !

त्रिची विमानतळावर ४७ अजगर, २ सरडे घेऊन उतरला प्रवासी !

 

“आरोपी कट्टर दहशतवादी आहेत… काही व्यक्तींचे व्हिडिओ पाहून आणि पुस्तके वाचून ते प्रभावित झाले होते… त्यांच्या चौकशीदरम्यान ते अनेक प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करत आहेत,” तो पुढे म्हणाला. त्यांच्यासोबत असलेला आरोपी, जो अटकेच्या वेळी पळून जाण्यात यशस्वी झाला, तो देखील कट्टर दहशतवादी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला पकडण्यासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत, असेही ते म्हणाले.

 

 

मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान (२३) आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी (२४) या दोन संशयितांना – राजस्थानमधील दहशतवादी प्रकरणातील कथित सहभागासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेला हवा होता, त्यांना पुण्यातील कोथरूड परिसरातून १८ जुलै रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर राज्य एटीएसने या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून घेतला.

 

 

इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून दक्षिण मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या छाबड हाऊसच्या प्रतिमा जप्त केल्या आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. “आम्हाला दोन दहशतवादी संशयितांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून मुंबईतील छाबड हाऊसच्या काही प्रतिमा सापडल्या आहेत. त्याशिवाय, विविध जिल्ह्यांतील गुगल मॅपच्या ठिकाणांचे स्क्रीनशॉट देखील जप्त करण्यात आले आहेत,” असे वरिष्ठ एटीएस अधिकाऱ्याने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

 

अटक केलेले दोन दहशतवादी संशयित (खान आणि साकी) हे मध्य प्रदेशातील रतलाम येथील असून ते ग्राफिक डिझायनर आहेत. दोघांवर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे इनाम होते, असे पोलिसांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, दहशतवादी प्रकरणाच्या तपासात त्यांची नावे समोर आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रतलाम येथून पळ काढला, ज्यामध्ये अल-सुफा संघटनेच्या काही संशयित सदस्यांना राजस्थान पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली होती, असे त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा