नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईमध्ये मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने मुंबईतील अंधेरी भागातून जवळपास पाच किलोचा चरस जप्त केला आहे. या जप्त केलेल्या चरसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ५० लाखांच्या घरात आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. एजन्सीच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
मुंबई युनिटने वॉटर प्युरिफायरमध्ये लपवून ठेवलेली ४.८८ किलो चरस जप्त केला आहे. जे कार्गो सेवेद्वारे ऑस्ट्रेलियाला पाठवली जाणार होती. कुरिअरच्या माध्यमातून चरस परदेशात पाठवले जाणार असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यांनतर मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि तपासादरम्यान अंधेरी स्थित एका कुरिअर कंपनीत धाड टाकली. त्या धाडीत कंपनीच्या एका पार्सलमध्ये चरस आढळून आले आहे. जप्त केलेल्या चरसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास ५० लाखांपेक्षा जास्त आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ हे चरस जप्त केले आहेत. त्यांनतर पुढील चौकशी दरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती एनसीबी मुंबई झोनल डायरेक्टर अमित घवाने यांनी दिली.
हे ही वाचा:
भारताच्या अर्थव्यवस्थेचे आणि पंतप्रधान मोदींचे अमेरिकेकडून कौतुक
‘अपक्ष आमदारांचं नाव घोषित करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन’
‘आमदार सांभाळता न येणं याला संजय राऊत जबाबदार’
‘राज्यसभा निवडणूक निकालानंतर अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय’
सापडलेले चरस हे वॉटर प्युरिफायरमध्ये ठेवले होते. त्यामध्ये लपवून ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणार होते. या रॅकेटमध्ये ज्या कुरिअर कंपनीच्या माध्यमातून हे ड्रग्ज ऑस्ट्रेलियात पाठविले जाणार होते, त्या कुरिअर कंपनीची फ्रेंचायजी या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. एवढच नव्हे तर ज्या एजंटनी हे पार्सल बुक केले होते. त्यांनी काहीही तपासणी न करता हे पार्सल बुक केला असल्याचा तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपस घेत आहेत.