खारमध्ये जेवणात गुंगीचे औषध देऊन ५० लाखाची लूट

पोलिसांचा तपास सुरू आहे

खारमध्ये जेवणात गुंगीचे औषध देऊन ५० लाखाची लूट

घरगड्याने मालकीण आणि कुटुंबियांच्या जेवणात गुंगीचे औषध देऊन ५० लाख रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना खार पश्चिम येथे घडली. बेशुद्ध पडलेल्या चार जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून खार पोलिसांनी दागिन्यासह पोबारा केलेल्या नोकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

राजा यादव उर्फ ​​निरज (१९) आणि शत्रुघ्न कुमार उर्फ ​​राजू (१९ )असे नोकरांची नावे आहेत. खार पश्चिम १४ वा रोड, येथे राहणाऱ्या सुनीता विजय झवेरी (५३) या १९ वर्षीय मुलीसोबत राहण्यास आहे सुनीता यांच्या पतीचा नोव्हेंबर २०२३ मध्ये दीर्घ आजाराने मृत्यू झाला आहे.

घरकाम करण्यासाठी झव्हेरी यांना घरगडीची गरज असल्यामुळे त्यांच्या पतीचा चालक संतोष रॉय याच्या ओळखीतून राजा यादव आणि शत्रूघन यांना महिन्याभरा पूर्वीच घरगडी म्हणून कामाला ठेवले होते. झव्हेरी यांच्या घरी जेवण बनविण्यासाठी मुकेश सिंग नावाचा नोकर होता, तर एक मोलकरणी धुणेभांड्यासाठी ठेवण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१० फेब्रुवारी रोजी सुनीता झवेरी यांच्या ६५ वर्षाच्या नणंद घरी भेटायला आलेल्या होत्या, रात्रीचे जेवण बनवून मुकेश सिंग हा निघून गेला होता. रात्री ९ वाजता घरगडी नीरज आणि शत्रुघ्न यांनी सुनीता झव्हेरी, मुलगी , नणंद आणि मोलकरिण यांना जेवण वाढले.जेवण केल्यानंतर, सर्वांना मळमळ झाली,त्यानंतर ११:३० सर्वजण झोपी गेले.

हे ही वाचा:

माकड टोपी गँगला अटक; घाटकोपरमधील एका ज्वेलर्सला करणार होते लक्ष्य

अशोक चव्हाण म्हणतात दोन दिवसांत स्पष्ट करणार राजकीय भूमिका

उद्धव ठाकरे आता निर्भय बनोच्या मंचावरही दिसतील!

एलॉन मस्क दहा लाख लोकांना मंगळावर नेणार!

दुसऱ्या दिवशी, जेव्हा सुनीता यांना जाग आली तेव्हा खोलीत सर्व वस्तू घरभर विखुरलेल्या होत्या,कपाटातील सामान देखील अस्तव्यस्त पडलेले होते, कपाटातील हिऱ्यांचे दागीने, रोकड गायब होती. घरगडी नीरज आणि शत्रुघ्न कुठे दिसून येत नव्हते. घरातील मोलकरिन सह सर्वाना अस्वस्थ वाटू लागले व उलट्या सुरू झाल्या. सुनीता यांनी बहिणीच्या मुलाला फोन करून बोलावून घेतले व बहिणीच्या मुलाने तात्काळ सर्वाना उपचारासाठी पी.डी.हिंदुजा रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती खार पोलिसांना मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन सुनीता झवेरी यांचा जबाब नोंदवून घटनास्थळाचा पंचनामा करून जेवणाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले, घरातील ५० लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.

या घटनेनंतर बेपत्ता झालेले नीरज आणि शत्रुघ्न याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

Exit mobile version