मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात ६ जून रोजी सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका मुलीचा मृतदेह विविस्त्र अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर या शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांची दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून न्याय देण्याचे आश्वासन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले. “वसतिगृहात घडलेल्या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्याच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या प्राथमिक अहवालानुसार वसतिगृहाच्या अधीक्षिका यांचे निलंबन करण्यात येत आहे,” असे चंद्राकांत पाटील म्हणाले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कुटुंबीयांना तपासाची सविस्तर माहिती देऊन पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. कुटुंबीयांनी खचून जाऊ नये, त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांच्या मुलाला कंत्राटी पद्धतीने तात्पुरती नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा:

नागपूरच्या अभियंत्याने बनविले इंधानाविना चालणारे पेरणी यंत्र

इंग्लंडचा आक्रमक खेळ; पहिल्याच दिवशी ३९३ धावांवर डाव घोषित

बिपरजॉयचं आगमन झालं आणि ७०० बाळांनी जन्म घेतला

सावरकर आमचे आदर्श, उद्धव ठाकरे गटाला आली जाग

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेऊन महिला सुरक्षा रक्षक देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर, मृत विद्यार्थीनीचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version