अंमली पदार्थ तस्कर अली असगर शिराझी आणि इतरांविरुद्ध दाखल झालेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील विविध ठिकाणी शोधमोहीम राबवल्या आहेत. ईडीच्या अधिकार्यांनी मंगळवारी दिलेल्या माहिती नुसार, झडतीदरम्यान, ५.५० लाख रुपयांची रोख रक्कम आणि ५७.११ लाख रुपयांचे सोने, मोबाइल फोन आणि लॅपटॉपसह विविध डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आले.
ईडीच्या म्हणण्यानुसार, १६,१७,१९ आणि २७ ऑक्टोबर रोजी शोध घेण्यात आला. ईडीने अली असगर शिराझी आणि इतरांविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांतर्गत मुंबईच्या जोगेश्वरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या आधारे तपास सुरू केला आहे. अली असगर शिराझी कडे पावणे आठ कोटी रुपयांचा केटामाईन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता.
हे ही वाचा:
पंड्या संघात परतल्यावर बाहेर कोण जाणार?
डाव्यांची काँग्रेससोबतची चर्चा फिसकटली; तीन राज्यांत स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात
रोहित शर्माच्या यशस्वी कर्णधारपदाचे रहस्य
पाकिस्तानला गोपनीय माहिती देणाऱ्याला राजस्थानमधून अटक
“ईडीच्या तपासात अली असगर शिराझी आणि संबंधित व्यक्ती आणि संस्थांशी निगडीत खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख ठेवी उघडकीस आलेल्या आहेत, ही सर्व रक्कम प्रथमदर्शनी अंमली पदार्थांच्या विक्रीतून कमावलेली बेकायदेशीर रक्कम असल्याचे समोर आले आहे . ईडीने अली असगर शिराझी आणि त्याच्या संबंधित व्यक्ती आणि संस्था, यांच्या मुंबईतील १० ठिकाणी शोध मोहीम कारवाई करण्यात आली. “ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.