अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये पुन्हा रक्तपात झाला आहे. येथे एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार करून पाच जणांची हत्या केली आहे. मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या गोळीबारात काही लोक जखमीही झाले आहेत. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले.
हल्लेखोर अचानक गर्दीच्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने गोळ्या झाडायला सुरुवात केली. समोर जे कोणी दिसेल त्याच्यावर तो गोळ्या झाडत गेला. यादरम्यान ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका पोलिसाचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. यासोबतच त्यांनी हल्लेखोरालाही पकडले आहे. सध्या लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
राणा आयुबचे ईडीने १ कोटी ७७ लाख रुपये गोठवले
आमिरवर जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात बॅनर झळकले
काश्मीर मुद्द्यावर टिपण्णी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने फटकारले
गोळीबारानंतर नाकाबंदी करण्यात आली आहे. या गोळीबारात एका पोलिस अधिकाऱ्यासह दोन जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॅरोलिनाच्या महापौरांनी गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिला आहे. गोळी झाडणारा हा अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या जवळ एक लांब बंदूक होती . सध्या त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. गोळीबाराचे कारण समजू शकले नाही.
अमेरिकेत अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अलीकडेच कॅलिफोर्नियातील एका शाळेतही एका अज्ञात व्यक्तीने शाळकरी मुलांवर गोळीबार केला होता. ऑकलंडमध्येही अलीकडेच शाळकरी मुलांना लक्ष्य करण्यात आले. ज्यामध्ये सुमारे १७ मुलांचा मृत्यू झाला होता.