28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामामुंबई गुन्हे शाखेकडून ५ कोटी ८० लाखांचे अमली पदार्थ जप्त

मुंबई गुन्हे शाखेकडून ५ कोटी ८० लाखांचे अमली पदार्थ जप्त

Google News Follow

Related

मुंबई गुन्हे शाखेने, पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. जवळपास दीड किलो अमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने ५ कोटी ८० लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

एक महिला आणि सोबत एक पुरुष यांच्याकडून गुन्हे शाखेने अमली पदार्थ जप्त केले आहेत. गेल्या सात महिन्यांपासून पोलीस या महिलेचा शोध घेत होते. गुन्हे शाखा ज्या वर्णनाच्या महिलेचा शोध घेत होते तशी संशयास्पद महिला पथकाला नजरेस पडली. सदर महिलेची हालचाल संशय निर्माण करणारी वाटल्याने सदर पथक वाहनातुन खाली उतरले आणि त्या महिलेची पहाणी केली.

स.पो.नि. सोनाली भारते यांनी सदर महिलेकडे एक बॅग होती त्या बॅगेची पाहणी केली असता तिच्याकडे लहान मुलांच्या दोन पाण्याच्या बॉटल होत्या. दोन्ही पाण्याच्या बॉटलचे झाकण उघडून पाहणी करता, आतमध्ये प्लॅस्टीकच्या पारदर्शक पिशवीमध्ये पावडर दिसून आली. याबद्दल महिलेला विचारणा केली प्रथम तिने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यांनतर तिच्याकडे पुन्हा पुन्हा विचारणा केली असता तिच्याकडे ‘हेरॉईन’ नावाचे अंमली पदार्थ असल्याचे तिने सांगितले. तसेच १ किलो ९३५ ग्रम अमली पदार्थासह तिच्याकडे ५ कोटी ८० लाख ५० हजार रोख रक्कम पथकाला आढळून आली आहे.

सदर महिलेला आणि तिच्या सोबतच्या इसमाला पथकाने ताब्यात घेतले आहे. सदर कारवाईचा सविस्तर पंचनामा करून त्याबाबत मानखुर्द पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवून मा. वरिष्ठांचे परवानगीने सदरचा गुन्हा, गुन्हे शाखा, कक्ष ३ येथे वर्ग करून सदर गुन्हयाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

पाच लाख दिव्यांपासून साकारली जाणार प्रभू रामचंद्रांची भव्य कलाकृती

शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक

आंदोलकांच्या भितीने अनिल परबांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ

इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होणार

सदरची कामगिरी मा. सह पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. मिलींद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. एस. वीरेश प्रभु मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री. नीलोत्पल, सहा. पोलीस आयुक्त, प्रकटीकरण- मध्य, श्री. नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गु.प्र.शा., कक्ष-३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सोपान काकड यांचे देखरेखीखाली पो.नि. निसर्ग ओतारी, म.स.पो.नि. भारते, स.पो.नि. प्रकाश लिंगे, पो.ना. ९७१०८७/देवार्डे, पो.ना. ०३७५१/ गिरकर, पो. शि.क्र. ०७.१३००/ सरवदे व पो.शि.क. १५०७८० / तांबडे यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा