मदरशातील शिक्षकांना कंटाळून ५ मुले बिहारला पळाली

मदरशातील शिक्षकांना कंटाळून ५ मुले बिहारला पळाली

हजारो किलोमीटर लांब कळव्यातील मदरशात शिक्षणासाठी आलेल्या बिहारमधील मुलांना मारहाण करून त्यांच्याकडून काम करून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही पाचही मुलं बिहारला आपल्या गावी पळून जाण्याच्या हेतूने मदरशातून पळाली. मदरशातून पळ काढून ते कळवा स्थानकातून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढले. या मुलांचं बोलणं ऐकून एका जागरूक महिलेने रेल्वे पोलिसांच्या मदत केंद्रात फोन करून माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी तात्काळ डोंबिवली रेल्वे स्थानकांत या मुलांना उतरवून ताब्यात घेतले असता, ही घटना उघडकीस आली.

कळवा स्थानकांतून १ ऑगस्ट रोजी १२ ते १४ वयोगातील ५ उत्तरभारतीय मुले प्रवास करीत असताना बिहारमध्ये पळून जाण्याच्या स्तिथीत असताना, डोबिवली स्थानकांतून मुलांना ताब्यात घेतले. मुलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मदरशातील २ शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करून डोंबिवली पोलिसांनी कळवा पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे.

हे ही वाचा:

१५ ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार

केजरीवाल यांचे ‘फुकट’चे उद्योग

शाळेत जाणाऱ्या मुलीचा विनयभंग करणारा जेरबंद

अबू आझमींना आला औरंगजेबाचा पुळका

डोंबिवली स्थानकात मुलांना उतरवल्यानंतर प्राथमिक चौकशी केली असता ही मुलं बिहारमधील खेडेगावातील असल्याचे सांगितले. रेल्वे पोलिसांनी या मुलांना ‘चाईल्ड वेल्फअर कमिटी’ समोर दाखल केले असता. कमिटीने त्यांना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील बालसुधारगृहात पाठविण्याचा आदेश दिला. कमिटीने मुलांच्या आई-वडिलांशी संपर्क केला असल्याचे सांगितले.

Exit mobile version