मुंबई गुन्हे शाखेने २६/११ दहशतवादी हल्ला प्रकरणात ४०५ पानांचे चौथे पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. हे आरोपपत्र पाकिस्तानी सैन्य दलातील माजी कॅप्टन तहव्वूर हुसैन राणा याच्या विरोधात असून या आरोप पत्रात राणाचा या हल्ल्यात असणारा सहभागाचा उल्लेख करण्यात आला आहे.
कॅप्टन तहव्वूर हुसैन राणा हा पाकिस्तानी सैन्य दलातील माजी कॅप्टन असून सध्या तो कॅनडात स्थायिक झाला आहे. मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी तौह्वुर राणा मुंबईत दाखल झाला होता, ११ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर पर्यंत तो मुंबईत राहिला आणि हल्ल्याच्या पाच दिवस अगोदर तो कॅनडात निघून गेला होता.
तपासादरम्यान मुंबई गुन्हे शाखेला राणाच्या विरोधात अनेक दस्तऐवज सापडले ज्यावरून असे दिसून येते की राणाने या हल्ल्यासाठी केवळ सक्रिय सह-कारस्थानाची भूमिकाच नाही, तर मुंबईवर हल्ला करण्यासाठी आर्थिक मदत देखील केली होती, या हल्ल्यात त्याने सक्रिय सहभाग घेतला आहे.
हे ही वाचा:
भारतीय वायुदलात ‘सी-२९५’ वाहतूक विमान दाखल!
पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त !
किरीट सोमय्यांना कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
नरेंद्र मोदींनी बाईक बंद करायला सांगितली तरच करणार!
हल्ल्यापुर्वी राणा डेव्हिड कोलमन हेडलीच्या नियमित संपर्कात होता आणि त्याने लष्कर-ए-तैयबाला लॉजीस्टिक पाठींबा ही दर्शविला होता. राणा असा व्यक्ती आहे ज्याने लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेला सर्व तपशील दिला होता, तसेच हेडलीला बनावट कागदपत्रांवर भारतीय पर्यटक व्हिसा मिळविण्यात मदत केली होती.